News Flash

‘मदतीचे नाटक करण्यापेक्षा…’, अक्षयला ट्रोल करणाऱ्यावर भडकली ट्विंकल

तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात कहर केलाय. दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अनेकांना ऑक्सिजन, औषधे आणि बेड मिळत नाही आहेत. अनेक कलाकार जमेल त्या पद्धतीने गरजूंना मदत करताना दिसत आहे. दरम्यान एका निवृत्त आयएएस (IAS) अधिकाऱ्याने अभिनेता अक्षय कुमार पुरेशी मदत करत नसल्याचे म्हटले आहे. ते पाहून अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने ट्विटरद्वारे त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

आयएएस अधिकाऱ्याने ट्विटरद्वारे अक्षयवर निशाणा साधला आहे. ‘ट्विंकल, तुझा नवरा देशातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. पैसे गेळा करुन मदत करण्याचे नाटक करण्यापेक्षा तुमच्या कुटुंबीयांनी मन आणखी मोठे करायला हवे होते. ही मदत मागण्याची नाही तर मदत करण्याची वेळ आहे’ या आशयाचे ट्वीट त्यांनी केले होते.

हे ट्वीट पाहून ट्विंकल खन्ना देखील शांत बसली नाही. तिने ‘आम्ही १०० कॉन्सन्ट्रेटर्स दिले आहेत आणि इतर जमेल त्या मार्गाने मदत करत आहोत. मी आधीही सांगितले होते, हे तुमच्या आणि आमच्यासाठी नाही तर गरजूंना मदत करण्यासाठी आहे. सध्याच्या कठिण काळात एकत्र येऊन काम करण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यात वेळ वाया घालवला जात आहे हे पाहून वाईट वाटले’ असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

सोनू सूद, सलमान खान, आलिया भट्ट, अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अजय देवगण, जॅकलिन फर्नांडिस, अनुष्का शर्मा आणि इतर कलाकार देखील या कठिण काळात मदत करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2021 7:22 pm

Web Title: twinkle khanna reaction on who says akshay kumar is not doing enough in covid 19 pandemic avb 95
Next Stories
1 जेव्हा लहान मुलांप्रमाणे मॅगी पाहून दुःखी होते सनी लिओनी, मजेशीर व्हिडीओ व्हायरल
2 ‘डॅडी’ झाले आजोबा, नव्या पाहुणीचे झाले आगमन
3 ‘ससुराल सिमर का २’ मालिकेतील अभिनेता करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X