ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम होते. १९७५ साली ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकात त्यांनी ‘लाल्या’ची भूमिका निभावली होती. सुरुवातीच्या काळामध्ये दूरदर्शनवरील मालिकांच्या माध्यमातून भाटकर यांचा चेहरा घराघरामध्ये पोहचला होता. अनेक मान्यवरांनी ट्विटवरुन भाटकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाहुयात कोण काय म्हणाले आहे भाटकरांना श्रद्धांजली अर्पण करतात…

उमदा कलाकार काळाच्या पडद्याआड: सुप्रिया सुळे</strong>

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली: सोनाली कुलकर्णी

भावपूर्ण श्रद्धांजली: सई ताम्हणकर</strong>

कलाविश्वाने एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व गमावलं: अजित पवार</strong>

भाटकर काका यांना भावपूर्ण श्रद्धांजली: स्वप्नील जोशी

अभिनयाच्या क्षेत्रातील ‘कमांडर’ हरपला: राधाकृष्ण विखे पाटील

भावपूर्ण श्रद्धांजली: माणिकराव ठाकरे

गेल्याच वर्षी ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये भाटकर यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. वयाची सत्तरी गाठली तरी त्यांचा कामाचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता.