23 September 2020

News Flash

अभिनेत्री उदिता गोस्वामी झाली दुसऱ्यांदा आई !

चित्रपट निर्माता मिलाप झवेरी याने ही गोड बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

उदिता गोस्वामी, मोहित सूरी

काही दिवसापूर्वी अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी एका गोंडस मुलीचं आगमन झालं. त्यानंतर आता ‘जहर’मधल्या ‘बोल्ड सीन्स’मुळे गाजलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी दुसऱ्यांदा आई झाली आहे. उदिताने एका मुलाला जन्म दिला आहे.

चित्रपट निर्माता मिलाप झवेरी याने ही गोड बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. उदिताला यापूर्वी एक मुलगी असून तिचं नाव देवी असं आहे. काही दिवसांपूर्वी उदिताने आपल्या बेबी बंपसोबत काही फोटो चाहत्यांसाठी शेअर केले होते. त्यानंतर आता तिला मुलगा झाला असून त्याचं नाव कर्मा असं ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


दरम्यान, उदिताने २००३ मध्ये ‘पाप’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता जॉन अब्राहमने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटानंतर उदिताने ‘जहर’ या चित्रपटामध्ये काही बोल्ड सीन दिले होते. या सीननंतर तिला अशाच भूमिकांसाठी विचारणा करण्यात येत होती. ज्यामुळे बॉलिवूडमध्ये तिची इमेज याच स्वरुपाची तयार झाली. त्यानंतर मात्र उदिताने बॉलिवूडपासून फारक घेत चित्रपट दिग्दर्शक मोहित सूरीसोबत लग्न केलं आहे. जवळपास आठ वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर त्यांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अगदी पारंपरिक पंजाबी पद्धतीने या दोघांनी लग्न केलं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2018 9:42 am

Web Title: udita goswami and mohit suri welcome baby boy
Next Stories
1 Photo : अशी दिसते झलकारीबाईंच्या रुपात अंकिता
2 Video : केंद्रीय मंत्र्यांसोबत सलमान खानने केले सायकलिंग
3 जावईबापू आले!, निकचं भारतात आगमन
Just Now!
X