News Flash

अबब..! अजगरसोबतचा फोटो शेअर करत उर्वशीने दिल्या ईदच्या शुभेच्छा

उर्वशीचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

(Photo Credit : Urvashi Rautela Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. उर्वशी सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. उर्वशी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. सध्या उर्वशी एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. उर्वशीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

उर्वशीने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोत उर्वशी अजगरसोबत असल्याचे दिसत आहे. या फोटोत उर्वशी स्टाईलमध्ये पूलमध्ये बसल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत उर्वशीने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोला ४ लाखापेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@urvashirautela)

काही दिवसांपूर्वी उर्वशी ‘VERSACE BABY’ या गाण्यामुळे चर्चेत होती. हे गाणं संपूर्ण जगात नंबर १ ला ट्रेंड करतं होतं. या गाण्यात ती इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदान सोबत दिसतं आहे.

उर्वशी ‘ब्लॅक रोझ’ या चित्रपटातून तेलुगू चित्रपटसृष्टीतही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. उर्वशी लवकरच अभिनेता रणदीप हुडासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरीजमध्ये दिसणार आहे. दरम्यान उर्वशी “ब्लॅक रोज” आणि “तिरुत्तू पायले 2” च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 10:17 am

Web Title: urvashi rautela poses with python wishes fans on eid photo viral dcp 98
Next Stories
1 करोनाविरुद्ध लढ्यात भारताच्या मदतीसाठी धावत आली जेनिफर एनिस्टन
2 जगण्याचा अजब-गजब मंत्र सांगणाऱ्या ‘राख’चे पोस्टर लॉन्च! अभिनेता संदीप पाठक मुख्य भूमिकेत
3 “आजीला नातवंडांना पाहायचं, पण तिची ही इच्छा मी पूर्ण करु शकणार नाही..,” अर्जुनने केला खुलासा
Just Now!
X