26 February 2021

News Flash

तारांगण घरात : पुन:प्रत्ययाचा आनंद

मी दररोज सकाळी उठून योगासने, चालणे असे व्यायाम करते.

वर्षां उसगावकर

मराठी चित्रपटसृष्टीत एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री वर्षां उसगावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आली आहे.  टाळेबंदीच्या काळातच ‘महाभारत’ मालिका दूरदर्शनवर परतली आणि आपली भूमिका पुन्हा एकदा लोकांसमोर आल्याने त्यांना आनंद झाला आहे.  त्या म्हणाल्या की, करोनामुळे मिळालेला वेळ सत्कारणी लावत मी वाचन, पाककला आणि व्यायाम करत आहे. राहिलेली कामे पूर्ण करणे, छंद जोपासणे आणि स्वत:ला वेळ देणे यात माझा वेळ मजेत जातो. मी दररोज सकाळी उठून योगासने, चालणे असे व्यायाम करते. विविध आसने आणि  श्वसनक्रिया केल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि मन निरोगी राहते आणि सारा दिवसही प्रसन्न होतो.

”मी गोव्याची असल्याने अस्सल खवय्यी आहे. मासे, चिकन हे माझ्या आवडीचे पदार्थ असून यूटय़ूबवरील व्हिडीओ पाहून नवीन पदार्थ करण्यास शिकले आहे. स्वयंपाकाची हौस इतरवेळी भागवता येत नाही. ती आता पुरेपूर भागवते आहे. शिवाय माझ्या मांजरींसह खेळताना वेळ कसा जातो ते कळतच नाही.” असे त्या सांगतात.

ऐंशीच्या काळात छोटय़ा पडद्यावर आलेल्या  रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ आणि बी.आर.चोप्रांच्या ‘महाभारत’ या दोन्ही मालिकांनी इतिहास रचला. आता खास लोकाग्रहास्तव ही मालिका पुन्हा एका खासगी वाहिनीवर दाखवण्यात येत असून, यात वर्षां उसगावकर यांनी उत्तराची भूमिका साकारली आहे. त्याबद्दल त्या म्हणतात, ”आज ३० वर्षांनंतर मालिका पाहताना तोच काळ पुन्हा अवतरला असल्याचे वाटते. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होतो. इतक्या वर्षांनंतर स्वत:ला पडद्यावर पाहणे एक वेगळाच अनुभव आहे.  या कालावधीत छोटय़ा पडद्यावरील आशय, तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल झाला आहे. उत्तराच्या भूमिकेसाठी मी गुरू गोपी क्रिष्णन यांच्याकडे मी शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. ‘महाभारत’ या मालिकेशी माझे भावनिक नाते असून, दिग्दर्शक रवी चोप्रांकडून खूप शिकायला मिळाले आहे. ” पूर्वीपासून पौराणिक मालिकांना विशिष्ट प्रेक्षकवर्ग लाभला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात या मालिका थोडी सकारात्मकता घेऊन येत आहेत, असेही वर्षां उसगावकर यांनी  सांगितले.

संकलन – मानसी जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 1:30 am

Web Title: varsha usgaonkar activity at home during lockdown zws 70
Next Stories
1 करोनाष्टक : सकारात्मकता महत्त्वाची
2 तारांगण घरात : अंतर्मुख होऊन जगाकडे बघताना..
3 करोनाष्टक : कंटाळय़ाला बुट्टी
Just Now!
X