बॉलिवूड अभिनेता वरूण धवन आणि नताशा दलाल काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे आणि प्री- वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या हनीमुन डेस्टिनेशनवरून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. त्यात आता चर्चा रंगली आहे ती त्यांच्या घराची. वरूणने एका मुलाखतीत सांगितले होते की तो त्याच्याच घरात नताशासोबत राहणार आहे.
अभिनेत्री करीना कपूरच्या ‘वॉट वूमन वॉन्ट’ या शोमध्ये वरूणने त्याची आणि नताशाची लव्हस्टोरी सांगितली होती. तेव्हा वरूण त्याच्या घराबद्दल बोलताना म्हणाला, “मी जेव्हा नवीन घर घेतले होते तेव्हा मी नताशासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार केला होता. माझ्या आणि नताशाच्या आई-वडीलांनी त्यासाठी परवानगी दिली होती… कारण आता माझ्याकडे स्वत: चे घर आहे मी माझ्या आई-वडीलांसोबत राहत नाही.”
PHOTOS: लग्नानंतर वरुण धवन पत्नीसोबत राहणार या आलिशान घरात?
View this post on Instagram
वरूणने २०१७ मध्ये नवीन घर घेतले होते. त्याचे घर खूप मोठ आणि सुंदर आहे. अनुपम खेर यांनी वरूणच्या घराच्या टूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत वरूणने त्याचा हॉल, बेडरूम, वर्क प्लेससोबतच लिव्हिंग रूम दाखवला आहे.
वरूणचे घर त्याची पत्नी नताशानेच डिझाइन केले होते. त्या दोघांच्या आवडी लक्षात घेत तिने हे घर डिझाइन केले होते. वरूणचे हे घर त्याच्या आई-वडीलांच्या घराजवळ आहे. वरूण आणि नताशाने २४ जानेवारी रोजी अलिबागमध्ये लग्न केले. नताशा ही वरूणची लहानपणापासूनची मैत्रिण होती. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर त्यांनी लग्न केलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 11:35 am