मुंबईच्या पावसाने ‘जुडवा २’ च्या प्रमोशनचे तीन तेरा वाजवले असले तरी तापसी पन्नु, वरुण धवन आणि जॅकलिन फर्नांडिस हे तिघे एकत्र असले की त्यांना सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोणत्याही जागेची गरज लागत नाही. कोलकाता येथे सिनेमाचे प्रमोशन केल्यानंतर हे तिघंही हैदराबादला सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेले होते. या प्रमोशनमध्ये वरुणने त्याला एखाद्या तेलगू सिनेमात काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. एवढेच बोलून तो थांबला नाही तर त्याने तेलगू बोलण्याचा प्रयत्नही केला.
I love Telugu films. First time attempted to speak the language #judwaa2 in 9 days pic.twitter.com/shJ5yZJcXi
— Varun PREM Dhawan (@Varun_dvn) September 20, 2017
पहिल्या प्रयत्नात वरुणने तापसी तेलगु बोलतानाचा व्हिडिओ काढला. या व्हिडिओत तापसी तेलगु बोलताना खूप क्युट दिसते, असं तो म्हणाला. तर दुसऱ्या व्हिडिओत ‘मला तेलगू सिनेमात काम करायचे आहे’ हे वाक्य तो बोलला. त्याच्या पहिल्याच प्रयत्नात त्याने अचुक तेलगू बोलल्यामुळे आजूबाजूचे सर्वच त्याच्यावर खूश झाले होते.
वरुण, जॅकलिन आणि तापसीला हैद्राबादला पोहोचायला तब्बल नऊ तास लागले होते. हैद्राबादला पोहोचल्यावर तापसीने ते सर्व सुखरूप असल्याचा मेसेज त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवला. येत्या २९ सप्टेंबरला हा धमाकेदार विनोदीपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 21, 2017 3:45 pm