News Flash

बाळासोबत वरुणची धमाल, अरुणाचल प्रदेशमधील चिमुकल्यासोबत फोटो शेअर

अरुणाचल प्रदेशमध्ये वरुण करतोय 'भेडिया'चं शूटिंग

अभिनेता वरुण धवन काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकला आहे. नताशा दलाल हित्यासोबत वरुणने लग्नगाठ बांधली आहे. वरुण सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग करतोय. ‘भेडिया’ या हॉरर कॉमेडी सिनेमाच्या शूटिंगसाठी वरुण अरुणाचल प्रदेशमध्ये गेला असून तिथले फोटो तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करतोय.

अरुणाचल प्रदेशमध्ये वरुण तिथल्या लहानग्यांच्या प्रेमात पडल्याचं दिसतंय. वरुणने एका चिमुकल्या सोबतचा व्हिडीओ आणि फोटो नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओत वरुण एका गोंडस बाळासोबत खेळताना दिसतोय. वरुण या बाळाच्या इतक्या प्रेमात पडलाय कि त्याला ते बाळ पुन्हा देऊच वाटत नाहिय. बाळाशी खेळत असताना “ओह हा किती गोड आहे” असं वरुणने बाळाला म्हंटलय. “अरुणाचल प्रदेशमधील बाळ थायगी कांबो याचं नावं आहे.” असं कॅप्शन वरुणने या पोस्टला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुणचा हा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. काही तासातचं या पोस्टला ९ लाखांहून अधिक लाईक मिळाले आहेत.

आधीदेखील वरुण धवन आणि क्रिती सेनन यांना एका बाळासोबत खेळताना स्पॉट करण्यात आलं होतं. अरुणाचल प्रदेशमधीलच एका दुसऱ्या शहरात ते शूटिंगसाठी गेले होते. यावेळी वरुण आणि क्रितीने एक एक करुन या बाळाला घेतलं.वरुणच्या फॅन क्लबवर त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varun Dhawan 24X7 (@varundvn.wisdom)

‘भेडिया’ या चित्रपटात वरूणसोबत अभिनेत्री क्रिती सॅनन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘भेडिया’ हा हॉरर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘स्त्री’ आणि ‘बाला’ या चित्रपटांचे दिग्दर्शक अमर कौशिक करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 9:01 am

Web Title: varun dhawan shares cute video playing with baby in arunachal pradesh kpw 89
Next Stories
1 ‘या’ मराठी अभिनेत्याच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन
2 ताहिरा कश्यपचा मुलांसोबतचा महिला दिन
3 सनीचे पॉर्न फिल्ममध्ये पर-पुरूषासोबत काम करणे डॅनियलला नव्हते पसंत म्हणून..
Just Now!
X