सध्या सोशल मीडियावर अनेक स्टार किड्स चर्चेत आहेत. त्यामधील एक नाव म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन. सोशल मीडियावर आराध्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका कार्यक्रमात आई- वडिलांसोबत डान्स करताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याच्या चुलत बहिणीचे लग्न होते. या लग्नाला अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांनी हजेरी लावली होती. दरम्यान आराध्याने अभिषेकच्या दोस्ताना चित्रपटातील ‘देसी गर्ल’ या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्यासोबत अभिषेक आणि ऐश्वर्या देखील डान्स करताना दिसत आहे. सध्या त्या तिघांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चर्चेत आहे. आराध्याचा डान्स पाहाण्यासारखा आहे. हा व्हिडीओपाहून आराध्या आईच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये आराध्याने गडद गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर ऐश्वर्याने चंदेरी रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याचे दिसत आहे. दोघीही या लूकमध्ये अतिशय सुंदर आहेत. दरम्यान त्यांनी ड्रेसवर मॅचिंग मास्क देखील लावले आहेत.
View this post on Instagram
सध्या आराध्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 5:08 pm