02 July 2020

News Flash

विराट-अनुष्कामध्ये ‘ऑल इज वेल’, बंगळुरूत पुन्हा एकदा दिसले एकत्र

दोघं एकत्र असतानाचा एक सेल्फी समोर आला आहे.

नुकतेच काही दिवसांपूर्वी या जोडीने एकत्र डिनर केला आणि दोघांच्या पॅचअपच्या चर्चा सुरू झाल्या. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसून आल्याने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

प्रसिद्धी आणि प्रगतीच्या शिखरावर असलेला भारतीय संघाचा शिलेदार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या नात्यात सारं काही आलबेल असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. विराट आणि अनुष्का नुकतेच बंगळुरूमध्ये एकत्र दिसून आले. दोघं एकत्र असतानाचा एक सेल्फी समोर आला आहे.
विराट आणि अनुष्कामध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा होती. मात्र, नुकतेच काही दिवसांपूर्वी या जोडीने एकत्र डिनर केला आणि दोघांच्या पॅचअपच्या चर्चा सुरू झाल्या. आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसून आल्याने ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
छायाचित्रात विराट माचो लूकमध्ये दिसून येतो, तर अनुष्काने पांढऱया रंगाचा टीशर्ट आणि डेनिम जॅकेट परिधान केला आहे. दोघांच्या चेहऱयावरचा आनंदच त्यांच्यात ‘ऑल इज वेल’ असल्याचे सांगून जातो.
विराट सध्या आयपीएलमध्ये एकामागोमाग एक आपल्या सर्वोत्कृष्ट खेळीचा नजराणा पेश करत आहे. तर अनुष्का बहुप्रतिक्षीत सुलतान चित्रपटात व्यस्त आहे. याशिवाय, तिच्या यादीत ‘ए दिल ए मुश्किल’ आणि ‘फिल्लौरी’ हे आगामी चित्रपट देखील समाविष्ट आहेत. ‘सुलतान’नंतर अनुष्का या दोन चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2016 1:07 pm

Web Title: virat anushka are bonding in bangalore and heres the proof
Next Stories
1 VIDEO: कपड्यांची चोरी करताना रितेश सीसीटीव्हीमध्ये कैद!
2 पाहा : ‘फोबिया’चे अचंबित करणारे नवे पोस्टर
3 छोटा परश्या, आर्ची आणि प्रदीपचा व्हायरल व्हिडिओ
Just Now!
X