24 October 2020

News Flash

PHOTO : नववर्षाच्या शुभेच्छा देताना ‘विरूष्का’चा सेल्फी मूड

हे दोघंही दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत

विराट कोहली, अनुष्का शर्मा

सरत्या वर्षात एकमेकांना नेहमीच साथ देण्याचे वचन देत विराट कोहली आणि अनुष्का शर्माने लग्नगाठ बांधली. आयुष्याची नवीन सुरुवात करत असतानाच विरुष्काने नवीन वर्षाचेही स्वागत केले आहे. २०१७ वर्षाचा शेवटही या दोघांनी गाजवला आणि आता २०१८च्या सुरुवातीलाही विरुष्का चांगलेच चर्चेत आहेत. दोघेही सध्या दक्षिण आफ्रिकेत असून सोशल मीडियावरून चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

‘तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे जावो,’असे कॅप्शन देत विरुष्काने सेल्फी पोस्ट केला आहे. या सेल्फीसोबतच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

VIDEO : नववर्षात किंग खानची चाहत्यांना अनोखी भेट

भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विराट आणि अनुष्का मुंबईला परतणार आहेत. त्यानंतर अनुष्का तिच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होणार आहे. शाहरुखसोबतच्या तिच्या आणखी एका चित्रपटाचेही नाव सोमवारी जाहीर झाले. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव ‘झिरो’ असे असून २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 6:56 pm

Web Title: virat kohli and anushka sharma begin new year with the perfect selfie moment
Next Stories
1 PHOTO : नव्या वर्षात सईचा बोल्ड अंदाज
2 नववर्षात किंग खानची चाहत्यांना अनोखी भेट
3 VIDEO : खिलाडी कुमारची नव्या वर्षात झेप
Just Now!
X