News Flash

विठुमाऊली मालिकेची भक्तीपूर्ण होणार सांगता

सर्वच कलाकार झाले भावूक

विठुमाऊली

जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीवरील विठुमाऊली ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेची सांगताही भक्तीपूर्ण वातावरणात होणार आहे. भक्त परंपरेची मुहूर्तमेढ रोवत आणि युगानुयुगे भक्तांचा माऊली प्रमाणे सांभाळ करण्याचं वचन देत विठुमाऊली शरीररूपाने अंतर्धान पावली. मात्र युगानयुगे विटेवरी उभी राहून ती भक्तांचा सांभाळ करते आहे.

संत पुंडलिक, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखोबा यांनी संत परंपरा अखंड चालू ठेवली आणि आजतागायत कोणताही खंड न ही परंपरा सुरू आहे. विठुमाऊली मालिकेचा अखेरचा भागही हाच संत परंपरेच्या संदेश देत पूर्णत्वास जाणार आहे. २२ मार्चला रात्री ८ वाजता महाएपिसोडने या मालिकेची सांगता होईल.

नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं. याप्रसंगी सर्वच कलाकार भावूक झाले होते. विठुरायाची भूमिका साकारणाऱ्या अजिंक्य राऊतने या प्रसंगी सर्व रसिकांचे मनापासून आभार मानले. ‘जगाला प्रेम देणारी माऊली स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सने माझ्यात पाहिली यासाठी मी कायम ऋणी राहीन. मौल्यवान शिंपल्यातल्या मोत्याप्रमाणे ही भूमिका माझ्यासाठी कायम अविस्मरणीय राहिल. पैश्याने सर्व गोष्टी विकत घेता येतीलही पण प्रेम कधीच विकत घेता येत नाही. या भूमिकेने मला रसिकांचं भरभरुन प्रेम दिलं जी आयुष्यभराची शिदोरी आहे. अशी भावना अजिंक्य राऊतने व्यक्त केली.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:10 pm

Web Title: vithu mauli marathi mythological serial to end soon ssv 92
Next Stories
1 मलायकाने कपडे घातले की नाही? व्हिडीओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न
2 Guilty Movie Review : अन्याय, अत्याचाराविरोधातला हुंकार!
3 त्या वादानंतर रोहित शेट्टीने कतरिनाला केले अनफॉलो?
Just Now!
X