26 February 2021

News Flash

विवेक ओबेरॉय या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक

विवेक ओबेरॉय याने राजकारणात प्रवेश करण्यासंबंधी वक्तव्य करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.

विवेक ओबेरॉय

‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता विवेक ओबेरॉय याने राजकारणात प्रवेश करण्यासंबंधी वक्तव्य करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. भविष्यात राजकारणात प्रवेश केल्यास वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं विवेक म्हणाला. त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित एका कार्यक्रमात त्याने ही इच्छा बोलून दाखवली.

‘मी राजकारणात प्रवेश केला तर २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी वडोदरा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितो. पंतप्रधान मोदी जेव्हा या मतदारसंघातून निवडणूक लढले, तेव्हा त्यांना स्थानिकांकडून मिळालेलं प्रेम आणि प्रतिसाद या गोष्टींमुळेच मलासुद्धा त्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे,’ असं तो म्हणाला.

ओमंग कुमार दिग्दर्शित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विवेक एका विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी त्याने विद्यार्थ्यांशीही संवाद साधला. या बायोपिकसाठी त्याने कशाप्रकारे तयारी केली हेसुद्धा त्याने सांगितले. बऱ्याच विरोधानंतर हा चित्रपट येत्या ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2019 11:40 am

Web Title: vivek oberoi says he will contest from vadodara if he joins politics
Next Stories
1 उर्मिलाच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप
2 ज जोडप्यांच्या जाहिरातीचा!
3 अभिनयातील ‘मुक्ता’ संचार
Just Now!
X