06 July 2020

News Flash

वाजिद खान यांच्या आईला करोनाची लागण

वाजिद खान यांचं सोमवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झालं. त्यांचाही करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

वाजिद खान व त्यांची आई रझिना

दिवंगत संगीतकार व गायक वाजिद खान यांच्या आई रझिना यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. वाजिद खान यांचं सोमवारी मुंबईतील रुग्णालयात कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. रुग्णालयात दाखल केल्यापासून वाजिद यांची आई त्यांच्यासोबत होती असं समजतंय.

‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार, वाजिद यांच्याआधीच त्यांच्या आईला करोनाची लागण झाली होती. किडनीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलेल्या वाजिद यांचा नंतर करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रझिना यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर येत आहे.

वाजिद यांचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टने झाल्याची माहिती साजिद खान यांनी पीटीआयशी बोलताना दिली. त्याचसोबत नंतर त्यांचा करोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी दुपारी वाजिद खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लॉकडाउन आणि करोना व्हायरसच्या भीतीमुळे फक्त २० जणांना अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पोलिसांच्या सुरक्षेत आणि निवडक कुटुंबीयांच्या उपस्थितीत वाजिद यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वाजिद खान यांच्या निधनावर कलाविश्वातून शोक व्यक्त करण्यात आला. अमिताभ बच्चन, सलमान खान, कतरिना कैफ, अक्षय कुमार, सोनम कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 10:15 am

Web Title: wajid khan mother razina tests positive for covid 19 report ssv 92
Next Stories
1 दीपिकाने शेअर केला रणबीरसोबतचा फोटो; पती रणवीरने दिली ‘ही’ प्रतिक्रिया
2 देवा मला आणखी एकदा लग्न करायचं, तीन लग्नांनंतर चौथ्या लग्नासाठी अभिनेत्रीची देवाकडे विनंती
3 गश्मीरचे वेब विश्वात पदार्पण, लवकरच दिसणार या वेब सीरिजमध्ये
Just Now!
X