‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ या अक्षय कुमार, सोनाक्षी सिन्हा आणि इमरान खान यांचा प्रेमाचा त्रिकोण असलेल्या चित्रपटातील चौथे आणि शेवटचे गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘चुगलियां’ हे गाणे जावेद अली आणि साहीर अली बग्गा यांनी गायले आहे. या गाण्याचे संगीत प्रितमचे असून, शब्द रजत अरोराचे आहेत.
प्रितमने ‘बर्फी’ आणि ‘कॉकटेल’ चित्रपटांच्या संगीतासाठी या वर्षीचे सर्व महत्वाचे पुरस्कार पटकावले आहेत.
‘ये तुने क्या किया’ या गाण्याप्रमाणे या गाण्यात देखील अक्षय, सोनाक्षी आणि इरफान यांच्या प्रेमाचा त्रिकोण दर्शविण्यात आला आहे.
‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा’ हा संगीतकार म्हणून प्रितमचा १००वा चित्रपट आहे.
पाहा पूर्ण गाणे:
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 5:02 am