28 October 2020

News Flash

VIDEO: ‘रामन राघव २.०’ चित्रपटातून वगळण्यात आलेला ‘तो’ सीन प्रदर्शित

सात मिनिटांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये राघव आपल्या गुन्ह्यांची कॅमेरासमोर कबुली देताना दिसतो.

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या ‘रामन राघव २.०’ या वास्तवदर्शी चित्रपटाला प्रेक्षक चांगली पसंती देत आहेत. त्यातच आता या चित्रपटातून वगळण्यात आलेल्या एका सीनचा व्हिडिओ नुकताच युट्यूबवर अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला आहे. या व्हिडिओला देखील नेटिझन्सची भरभरून पसंती मिळत आहे. वगळ्यात आलेला हा सीन देखील चित्रपटात हवा होता, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया देखील नेटिझन्सने व्यक्त केल्या आहेत.

युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या सात मिनिटांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये राघव (अभिनेता विशाल कौशल) आपल्या गुन्ह्यांची कॅमेरासमोर कबुली देताना दिसतो. आयुष्याला कंटाळलेला राघव गोळी घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण हिम्मत होत नसल्याने होणारा त्रागा व्हिडिओमध्ये दिसून येतो. याशिवाय, ड्रग्जचे व्यसनात तो बुडालेला दाखविण्यात आला आहे. मला आपल्या वडिलांसारखं अजिबात व्हायच नाहीय, अशा स्वरुपाचे राघवचे संवाद या व्हिडिओमध्ये आहेत. वडिलांमुळे त्याच्या आयुष्याला मिळणाऱया वळणामुळे तो नाखुष असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. त्याचे वडिल देखील पोलीस अधिकारी होते.

चित्रपटात विशाल कौशल आपल्या वडिलांची भेट घेण्याआधीचा हा सीन आहे. मात्र, तो चित्रपटात वापरण्यात आला नाही. रामन राघव २.० हा चित्रपट सत्यघटनेवर आधारीत असून, ६० दशकात मुंबईत घडलेल्या सिरिअल किलिंगच्या घटनेवर चित्रपटाचे कथानक आहे. अभिनेता नावजुद्दीन सिद्दिकी चित्रपटात मुख्य भुमिकेत आहे.

व्हिडिओ-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2016 2:00 pm

Web Title: watch this intense deleted scene from raman raghav 2 0 featuring vicky kaushal
Next Stories
1 पुढच्या चित्रपटासाठी आलियाचा जीममध्ये हार्ड वर्कआऊट
2 ‘बाजी जितने से है, चाहे प्यादा कुर्बान हो या रानी’, ‘रुस्तम’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
3 विमानावर प्रमोशनचा रजनीकांतच्या ‘कबाली’चा वेगळा फंडा
Just Now!
X