बॉलीवूडचा नवा रॉकस्टार वरूण धवन आणि इलियाना डिक्रुझ यांच्या ‘मै तेरा हिरो’ चित्रपटातील ‘बेशरमी की हाइट’ गाणे प्रदर्शित झाले आहे.
‘बेशरमी की हाइट’ हे एक पार्टी साँग आहे. गाण्याचे संगीत, इफेक्टस, वातावरण आणि त्यातले लूक लगेचच डिस्कोची आठवण करून देतात. या गाण्यास संगीत साजिद-वाजीदने दिले असून, त्यांनी ते गायलेदेखील आहे. वरूण आणि इलियानाचे डान्स मूव्हस् प्रेक्षकांनाही गाण्यावर थिरकण्यास भाग पाडणारे आहेत. डेव्हिड धवन यांच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटासाठी आवश्यक असलेला मसाला यात ठासून भरलेला आहे. रोमान्सपासून कॉमेडीपर्यंत आणि खुसखुशीत संवादांपासून हाणामारीपर्यंत यात सर्व काही आहे. एलेना डिक्रुझ आणि नर्गिस फाखरी बॉलिवूडच्या या दोन सुंदऱ्याबरोबर वरुण रोमान्स करताना दिसणार आहेत. आलिशान सेट, खुसखुशीत संवाद आणि आनंदी वातावरण दाखविण्यात आलेला हा चित्रपट डेव्हिड धवन यांच्या नेहमीच्याच शैलीतला आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी प्रॉडक्शन’ बॅनरखाली बनलेला हा चित्रपट ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2014 4:52 am