बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘संजू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या वर्षात पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमावणारा चित्रपट ठरला. प्रेक्षक- समीक्षकांकडून रणबीरच्या अभिनयाची आणि राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाची प्रशंसा होत आहे. तर गेल्या दोन आठवड्यांपासून रणबीर विविध कार्यक्रम आणि मुलाखतींमध्ये ‘संजू’ची प्रसिद्धी करण्यात व्यग्र आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडचे दिग्गज सलमान खान, अजय देवगण, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनीसुद्धा ‘संजू’ची प्रसिद्धी अनोख्या प्रकारे केली, ते सुद्धा जवळपास २० वर्षांपूर्वीच.
चित्रपट पाहण्यापूर्वी किंवा पाहिल्यानंतर ट्विटरवर किंवा मुलाखतीत प्रतिक्रिया देताना त्यांनी ‘संजू’ची प्रशंसा केल्याचं आम्ही म्हणत नाही आहोत. ऋषी कपूर यांनी नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये चौघांच्या हातात संजय दत्तचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यावर ‘संजू, आम्ही तुझ्यासोबत आहोत,’ असा मजकूरसुद्धा लिहिलेला आहे.
Thank you! These people been promoting the film ever since! pic.twitter.com/Ot2iDM9Hk7
— Rishi Kapoor (@chintskap) June 29, 2018
‘तेव्हापासूनच हे चौघे चित्रपटाची प्रसिद्धी करत आहेत,’ असं गमतीशीर कॅप्शन ऋषी कपूर यांनी या फोटोला दिला आहे. खरंतर १९९३ साली मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी संजय दत्तला अटक झाल्यानंतर त्याला मानसिक आधार देण्यासाठी हे अभिनेते एकत्र आले होते. त्यावेळी संजूचा फोटो हातात घेत त्यांनी हा फोटो काढला होता. ऋषी कपूर यांनी गंमत म्हणून हा फोटो शेअर केला पण खरंच सध्या सलमान, अजय, अक्षय आणि सैफ हे आतासुद्धा ‘संजू’ या चित्रपटाची प्रसिद्धी करत आहेत.