News Flash

जेव्हा सलमान दुचाकीस्वारांवर धावून जातो!

या सर्व घटनेचा एक व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाला असून, तो चांगलाच व्हायरल होत आहे.

| January 30, 2015 10:58 am

जेव्हा सलमान दुचाकीस्वारांवर धावून जातो!

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान ‘बजरंगी भाईजान’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानमध्ये आला असता, काही टवाळ दुचाकीस्वारांनी त्याला चांगलेच सतावले. आपल्या पांढऱ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीतून सलमान चित्रीकरणाच्या ठिकाणी जात असताना काही दुचाकीस्वारांनी सलमानच्या ताफ्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. सलमानचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्याच्या दुतर्फा सलमानची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. सलमानला आवाज देऊन त्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न हे चाहते करीत होते. दुचाकीवर स्वार झालेले काहीजण सलमानचे व्हिडिओ चित्रणदेखील करत होते. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या गाडीजवळही येत होते. हे दुचाकीस्वार सतत सलमानच्या गाडीसमोर येऊन त्याच्या गाडीला अडथळा निर्माण करत होते. यासर्व प्रकारात जेव्हा एक दुचाकीस्वार सलमानच्या गाडीखाली येतायेता राहतो, तेव्हा इतक्यावेळ शांत असलेल्या सलमानचा पारा चढतो. बऱ्याच काळ चाललेल्या या प्रकारामुळे आधीपासूनच चिडलेला सलमान गाडी रस्याच्या कडेला थांबवून खाली उतरत चित्रपटातील एखाद्या हिरोसारखा या टवाळखोर दुचाकीस्वास्वारांवर धावून जातो. परंतु, सलमानला गाडीतून खाली उतरलेला पाहून चाहत्यांमधील जोश अजूनच वाढतो. या सर्व घटनेचा एक व्हिडिओ युट्यूबवर प्रसिद्ध झाला असून, तो चांगलाच व्हायरल होत आहे.


संबंधित व्हिडिओ यू ट्यूबवरील ‘लव्ह सलमान’ या चॅनेलवर टाकण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 10:58 am

Web Title: when salman khan got angry with his fans
टॅग : Salman Khan
Next Stories
1 शकीराला दुसऱ्यांदा पुत्ररत्न!
2 “चीटर” चित्रपटात सोनू निगमची दोन मराठी गाणी
3 ‘चला हवा येऊ द्या’ ची यशस्वी पन्नाशी
Just Now!
X