बॉलिवूडचा बादशहा म्हणजे शाहरुख खान नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत जोडून राहण्यासाठी काही ना काही करत असतो. १ फेब्रुवारीला शाहरुखने ट्विटरवर #AskSRK च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी लाइव्ह गप्पा मारल्या. त्याच्या या गप्पांमध्ये असे काही विचित्र प्रश्न होते की शाहरुखलाही काय उत्तर द्यावे असा प्रश्न पडला असेल. त्याच्या एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, मी हनीमूनला कुठे जाऊ? चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुखनेही मस्करीमध्ये सांगितले की,

फक्त एवढेच नाही तर एका चाहत्याने असेही ट्विट केली की जर त्याच्या ट्विटला शाहरुखने उत्तर दिले नाही तर, त्याच्या आईने त्याला घरी न येण्याचे सांगितले. त्याच्या या ट्विटला उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, ‘जा बेटा जा। जीले अपनी जिंदगी।’

दरम्यान, ‘रईस’ सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुखने नुकताच गुजरात दौरा केला. यावेळी शाहरुखने काही महिलांचीही भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. ज्यामध्ये त्याने स्वयंसेवक महिला संघटनेच्या महिला चाहत्यावर्गाला आवर्जून भेट दिली होती. या भेटीत ७० वर्षाच्या वृद्ध महिला चाहतीचे शाहरुखने अनोख्या अंदाजात आभार मानले होते. तूला कधीही विसरु शकणार नसल्याचे सांगण्यासाठी शाहरुखने या महिलेसमोर त्याच्या ‘जब तक है जान..’ सिनेमातील संवाद फेकीने मनं जिंकण्याचा प्रयत्न केला होता. आजीबाईंना जब तक है जान.. ही ओळ ऐकवताना गुडघ्यावर बसून शाहरुखने प्रेम व्यक्त केले होते. शाहरुखचा हा अनोखा अंदाज पाहून ही महिला चांगलीच भारावून गेल्याचे दिसले होते. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये फक्त १५ वर्षांच्या तरुण-तरुणाईचाच समावेश नाही. तर ७० वर्षांची आजीदेखील शाहरुखच्या चाहत्यांच्या यादीत आहे असेच म्हणावे लागेल.

यापूर्वी शाहरुख खानच्या पुणे दौऱ्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. पुण्यातील सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये शाहरुख तरुणींच्या गराड्यात दिसला होता. सिम्बायोसिसच्या कॅम्पसमधील तरुणींसोबतचा एक सेल्फी चांगलाच व्हायरल झाला होता. शाहरुखच्या सेल्फीमध्ये अनेक तरुणींसोबत हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान करुन उभी असणारी तरुणीने नेटीझन्सना घायाळ केले होते. नेटीझन्सनी शाहरुखच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया नोंदविल्याचेही पाहायला मिळाले. कोणी या तरुणीला सौंदर्यवतीची उपमा देताना दिसले तर कोणी तिची तुलना चक्क मॉडेलसोबत करताना दिसले. या सेल्फीतील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या सौंदर्यवती तरुणीच्या संदर्भात शाहरुखने देखील ट्विटरच्या माध्यमातून टीपणी केली होती.