21 October 2020

News Flash

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील बहुतांश कलाकारांची या चित्रपटात वर्णी

मालिका संपल्यावर काय, असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना होताच, पण यावर दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.

सध्या फिल्मी विश्वात चर्चेत असलेला चित्रपट ‘पळशीची पीटी’ एक वेगळ्या गोष्टीमुळे देखील चर्चेत आहे. सोशल मीडियावर एक एक करत दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांनी कलाकारांच्या रूपाने सगळे पत्ते खोलले आणि सर्वत्र एकचं चर्चा सुरू झाली. सुप्रसिद्ध मालिका ‘लागीर झालं जी’ मधील जेमतेम सर्वच कलाकार या चित्रपटात आहेत. मालिका संपल्यावर काय, असा प्रश्न सर्व प्रेक्षकांना होताच, पण यावर दिग्दर्शकांनी मौन सोडलं आहे.

खरं तर ‘लागीर झालं जी’ मालिका सुरू होण्याआधीच सर्व कलाकार पळशीची पीटीसाठी काम करत होते. फिल्मचं लोकेशन साताऱ्यात असल्या कारणामुळं मालिकेसाठी ऑडिशन देणं सर्वांना सोईस्कर झालं. सर्व कलाकारांच्या उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर त्यांना मालिकेतदेखील संधी मिळाली आणि या संधीचे सोने केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेच.

आणखी वाचा : जेव्हा जेनेलियाला झाला अमेयमध्ये रितेश दिसल्याचा भास 

२३ ऑगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित होणारा चित्रपट ‘पळशीची पीटी’मध्ये ‘भागी’ ची भूमिका साकारणारी किरण ढाणे, राहुल बेलापूरकर, राहुल मगदूम, धोंडिबा कारंडे, विद्या सावळे, शिवानी घाटगे, दिक्षा सोनवणे, निलीमा कमाणे इत्यादींचा समावेश आहे. तसेच तेजपाल वाघ यांनीदेखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली असून लागीर…मध्ये ‘जितू काका’ यांची भूमिका साकारणारे संदीप जंगम यांनी चित्रपटाची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे छायाचित्रण तसेच एडिटिंग केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्व लागीरंची टीम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार झालेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:32 pm

Web Title: whole team of lagir zala ji in the upcoming marathi movie ssv 92
Next Stories
1 …तर सलमानऐवजी ‘हा’ अभिनेता दिसला असता चुलबूल पांडेच्या भूमिकेत
2 जेव्हा जेनेलियाला झाला अमेयमध्ये रितेश दिसल्याचा भास
3 ‘सुपर ३०’च्या गाण्यावर हृतिकच्या आईचा डान्स पाहिलात का?
Just Now!
X