अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे नावं आता अनेकांनाच माहीत आहे. सोशल मीडियावर एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिया प्रकाशझोतात आली. तिच्या पहिल्या चित्रपटातील डोळा मारतानाचा हा व्हिडीओ होता. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला नाही. पण प्रिया मात्र प्रसिद्ध झाली. आता प्रियाने आणखी एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे आणि सोशल मीडियावर सध्या त्याच व्हिडीओची चर्चा होत आहे.

या व्हिडीओमध्ये सिनेमॅटोग्राफर सिनू सिद्धार्थ आणि प्रिया एकमेकांना किस करू पाहतात पण त्यात एक ट्विस्ट आहे. किस करण्यासाठी एकमेकांजवळ येताच सिनेमॅटोग्राफरचं लक्ष वेगळ्याच गोष्टीकडे जातं. या प्रँक व्हिडीओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

https://www.instagram.com/p/B0C_FbJAY3m/

प्रियाच्या ‘ओरु अदार लव्ह’ या पहिल्या मल्याळम चित्रपटासाठी सिनू सिद्धार्थने सिनेमॅटोग्राफरचं काम केलं होतं. प्रियाच्या हातात सध्या दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. त्यापैकी एक ‘श्रीदेवी बंगलो’ आणि दुसरा ‘लव्ह हॅकर्स’ आहे. याचसोबत तिने एक तेलुगू चित्रपटसुद्धा साइन केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.