News Flash

‘केजीएफ चॅप्टर – २’चे पुन्हा चित्रीकरण सुरु

यशने ट्विट करत दिली माहिती..

‘केजीएफ चॅप्टर – १’ हा दाक्षिणात्य चित्रपटांमधील अतिशय लोकप्रिय आणि हिट चित्रपट आहे. या चित्रपटात सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘केजीएफ चॅप्टर – २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त देखील भूमिका साकारणार आहे. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. आता सर्व काही पूर्वपदावर येत असताना या चित्रपटाचे देखील चित्रीकरण सुरु झाले आहे.

नुकताच यशने ट्विट करत ‘केजीएफ चॅप्टर – २’ चे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे याची माहिती दिली आहे. ‘समुद्राच्या लाटा कधी थांबत नाहीत. मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा चित्रीकरणास सुरुवात’ असे यशने ट्विटमध्ये म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात तो अधीरा हे पात्र साकारणार आहे. काही महिन्यांपूर्वी संजय दत्तने या आगामी चित्रपटाचा पोस्टर शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. दुसरा भागाचा आवाका पहिल्या भागापेक्षाही अधिक मोठा असेल असे अभिनेता यशने सांगितले होते. हा चित्रपटही पहिल्या भागाप्रमाणेच हिंदी, तामिळ आणि कन्नड या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 5:22 pm

Web Title: yash resumes shooting for kgf chapter 2 avb 95
Next Stories
1 आशा नेगीने सेटवर अपेक्षापेक्षा जोरात अभिनेत्याच्या लगावली कानशिलात
2 भविष्यवाणी ठरली खरी; करोना काळातही ‘या’ चित्रपटानं केली कोट्यवधींची कमाई
3 “इथे वाटीभर पाण्यात डुंबणाऱ्यांना नैसर्गिक मृत्यू येतो”; पायल घोषने उडवली बॉलिवूडची खिल्ली
Just Now!
X