‘बिग बॉस’ तमिळमधून लोकप्रियता मिळणारी दाक्षिणात्य अभिनेत्री याशिका आनंद हिचा कार अपघात झालाय. ती आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर एक ट्रिपवर निघाली होती. या दरम्यान महाबलीपुरम इथल्या ईस्ट कोस्ट रोड इथे त्यांची कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली आणि रस्त्यावरील एक खड्ड्यात जाऊन कोसळली. या कारमध्ये एकूण चार जण होते. यात तिची मैत्रिण वल्लिचेट्टी भवानी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर याशिका गंभीररित्या जखमी झालीय.

‘धुरुवंगल पथिनारु’ फेम याशिका आनंद हिचा 25 जुलै रोजी रात्री 1 च्या दरम्यान हा कार अपघात झाला. एक एसयूवी कार रात्रीच्या वेळी ओवरस्पीडमध्ये जाताना पाहून ईस्ट कोस्ट रोड वरील प्रत्येक जणच आश्चर्य झाले. अशाच त्यांची कार रस्त्यावरील डिव्हाडरला धडकली आणि रस्त्यावरील एक खड्ड्यात जाऊन कोसळली. खड्ड्यात कोसळलेली कार पाहून तिथल्या नागरिकांनी कारमध्ये तीन जण अडकलेले पाहून त्यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. यात तीघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दुर्दैव म्हणजे, या अपघातात याशिकाची मैत्रिण वल्लीचेट्टी भवानीला वाचण्यासाठी नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिक्षा करावी लागली. वल्लीचेट्टी भवानी ही कारमध्ये फसली होती आणि मदतीच्या प्रतिक्षेतच तिने कारमध्येच अखेरचा श्वास घेतला, असं बोललं जातंय.

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची शक्यता?

या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी वल्लीचेट्टी भवानीचा मृतदेह शवविच्छेनासाठी चेंगलपेट रूग्णालयात पाठवण्यात आलाय. या घटनेत ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वी आधी डॉक्टरांच्या रिपोर्टची प्रतिक्षा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

या चित्रपटात केलंय काम

अभिनेत्री याशिका आनंद तमिळनाडुची एक लोकप्रिय मॉडेल आहे. ‘कवलाई वेंदम’, ‘नोटा’ आणि ‘धुरुवंगल पथिनारू’ सारख्या चित्रपटांत तिने काम केलंय. ‘इरुत्तु अरैयिल मुराट्टू कुथु’ मध्ये सुद्धा तिने महत्त्वाची भूमिका साकारलीय.