‘ऑस्कर’ हा सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. त्यामुळे सिनेउद्योगात कार्यरत असलेला प्रत्येक कलाकार हा पुरस्कार पटकवण्याची स्वप्न पाहतो. तसं पाहिलं तर या पुरस्काराची सुरुवात प्रामुख्याने अमेरिकन चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी झाली होती. पण गेल्या काही दशकात जगभरातील कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेऊन ऑस्करला प्रतिष्ठेच्या शिखरावर पोहोचवलं. दरम्यान यंदाचा ऑस्करही नेहमीपेक्षा वेगळा असणार आहे. कारण यंदा चक्क सुदान या देशानं देखील आपला एक चित्रपट ऑस्कर स्पर्धेसाठी पाठवला आहे.

अवश्य पाहा – ‘म्हशीचं हंबरणं चालेल पण हे गाणं नको’; अमृता फडणवीसांच्या गाण्यावर मराठी कलाकाराची टीका

आता तुम्ही म्हणाला यात काय नवीन, दरवर्षी जगभरातील देश ऑस्करसाठी चित्रपट पाठवतात. पण सुदान मात्र त्याला अपवाद आहे. या देशानं इतिहासात पहिल्यांदाच आपला चित्रपट ऑस्करसाठी पाठवला आहे. या चित्रपटाचं नाव ‘यु विल डाय अॅट २०’ असं आहे. हा एक ड्रामा पठडीतील चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करतोय. चित्रपटाचा निर्माता अमजद अबु अलाला याने ट्विट करुन ही आनंदाची बातमी जगभरातील प्रेक्षकांना सांगितली.

अवश्य पाहा – VIDEO: कर्करोगग्रस्त अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; चाहत्यांकडे मागितली आर्थिक मदत

अवश्य पाहा – पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची हत्या

सुदान हा आर्थिकदृष्ट्या अत्यंत मागास देश आहे. आफ्रिका खंडाच्या उत्तरेकडे असलेल्या या देशामध्ये गेली अनेक दशकं इस्लामिक शासन होतं. परंतु वर्षानुवर्ष आंदोलन केल्यानंतर या देशात आता लोकशाही आली आहे. राजकिय संघर्षामुळे या देशात कला, ज्ञान, क्रिडा या गोष्टींना कधी प्रोत्साहन मिळालं नाही. या देशातील अनेक कलाकार अमेरिका, युरोप इथे जाऊन काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. गेल्या कित्येक वर्षात या देशातील प्रेक्षकांनी चित्रपट पाहिलेले नाहीत. अशा देशातील एक निर्माता चित्रपट निर्मिती करुन थेट ऑस्करसाठी पाठवतो. या गोष्टीचं सर्वत्र कौतुक होत आहे. ‘यु विल डाय अॅट २०’ या चित्रपटानं अद्याप नामांकन मिळवलेलं नाही. पण या चित्रपटाची हवा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाणवत आहे.