बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. ५ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आठ दिवसात बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. जवळपास १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली आहे. तसेच आता बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्वीट करत सूर्यवंशी चित्रपटाने आठ दिवसांमध्ये किती कमाई केली आहे याबाबत माहिती दिली आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. शुक्रवारी २६ कोटी २९ लाख रुपये, शनिवारी २३ कोटी ८५ लाख रुपये, रविवारी २६ कोटी ९४ लाख रुपये, सोमवारी १४ कोटी ५१ लाख रुपये, मंगळवार ११ कोटी २२ लाख रुपये, बुधवारी ९ कोटी ५५ लाख रुपये आणि गुरुवारी ८ कोटी ३० लाख रुपयांची कमाई चित्रपटाने केली. चित्रपटाने एकूण १२० कोटी ६६ लाख रुपयांची कमाई केली आहे या आशयाचे ट्वीट तरण आदर्श यांनी केले आहे.
आणखी वाचा : अंकिता लोखंडे डिसेंबर महिन्यात बॉयफ्रेंड विकी जैनशी करणार लग्न?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार, रणवीर सिंह, कतरिना कैफ आणि अजय देवगण अशी तगडी स्टार कास्ट आहे. तसेच अभिनेते गुलशन ग्रोव्हर खलनायकाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट देशात ३,५०० स्क्रीन्सवर आणि परदेशात १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू करताना दिसत आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.