‘एव्हरेस्ट’ या टीव्ही शोद्वारे आशुतोष गोवारीकर छोट्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. ‘लगान’ आणि ‘जोधा अकबर’च्या यशानंतर या शोच्या निमित्ताने ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर. रेहमान आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. या शोचा फर्स्ट लूक १६ सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले. स्टार प्लस वाहिनीवरील या शोसाठी आशुतोष गोवारीकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे रेहमान यांनी आनंद व्यक्त केला. याविषयी बोलताना रेहमान म्हणाले, मी या आधीदेखीरल आशुतोषबरोबर काम केले असून, तो फारच छान अनुभव होता. त्यानी मला ‘एव्हरेस्ट’ या शो विषयी कल्पना दिली असून, शोचे शीर्षक गीत मी तयार केले आहे. या शोसाठी माझ्या संगीत विद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या संगीताचादेखील मी वापर करणार आहे. छोट्या पडद्यावर काम करण्याचा अनुभव चांगला असल्याचे मत व्यक्त करीत, भारतीय टीव्हीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचे रेहमान म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2014 रोजी प्रकाशित
आशुतोष गोवारीकर यांच्या टीव्ही शोला ए. आर. रेहमान यांचे संगीत
'एव्हरेस्ट' या टीव्ही शोद्वारे आशुतोष गोवारीकर छोट्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. 'लगान' आणि 'जोधा अकबर'च्या यशानंतर या शोच्या निमित्ताने ऑस्कर पुरस्कार विजेते...

First published on: 17-09-2014 at 05:14 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसंगीतMusicहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A r rahman scores music for ashutosh gowarikers debut tv show