मराठी अभिनेत्री आदिती पोहनकर ही सध्या SHE या वेबसीरीजमुळे चर्चेत आली आहे. आदिती पोहनकरने या सीरिजमध्ये एका पोलिसाची भूमिका केली आहे. तिच्या SHE या वेबसीरिजमधल्या कामाचे चांगलंच कौतुक झालं आहे. अदितीने रितेश देशमुखच्या ‘लई भारी’ चित्रपटात झळकल्यानंतर ती बॉलिवूडमध्ये झळकली होती. नुकतंच अदितीने मराठीत सिनेसृष्टीत कमबॅकबद्दल भाष्य केले आहे.

आदितीने निशिकांत कामतच्या लई भारी चित्रपटातून दमदार एंट्री केली होती. सध्या तिने नेटफ्लिक्सच्या सिरीजमध्ये केलेलं काम फारच पसंत केलं जात आहे. या वेबसीरिजचे दुसरे पर्व चांगलेच गाजताना दिसत आहे. नुकतंच तिला एका मुलाखतीत मराठीतील कमबॅकबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली, “कमबॅक करायला मी कुठे गेलेच नाही. मी इथेच आहे.”

“मला नागराज मंजुळेंसोबत काम करायची मनापासून इच्छा आहे. त्यांच्या कामाने मी प्रभावित झाली आहे. एखादी मस्त स्क्रिप्ट असेल तर त्यांच्यासोबत करायला मजा येईल. मला ते एक दिग्दर्शक म्हणून फार आवडतात.” असे आदिती पोहनकर म्हणाली.

“मी माझ्या पात्राकडून म्हणजे भूमीकडून हे शिकले की कोणत्याही गोष्टीचं जास्त प्लॅनिंग करु नये. मी ते सर्व हळूहळू करायचा प्रयत्न करते आहे. खूप प्लॅनिंग केलं की फक्त गोंधळ वाढतो. त्यापेक्षा त्या त्या वेळी योग्य निर्णय घेणं जास्त सोपं आणि कमी त्रासदायक आहे.” असेही तिने म्हटले.

View this post on Instagram

A post shared by Aaditi S Pohankar (@aaditipohankar)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आदितीने मराठी, हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये काम केले आहे. तर अभिनयासोबत अदितीला गाणं देखील आवडतं. त्यासोबत निशिकांत कामत, इम्तियाज अली, प्रकाश झा यांसारख्या नामांकित दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे.