छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच स्टार प्रवाहवर एक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तिथे अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणीर अभिनेत्री अश्विनी महांगडे देखील तिथे उपस्थित होती. तेव्हा अश्विनीने तिच्या आयुष्यातील वाईट काळ ते तिच्या डिप्रेशनविषयी सांगितले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अश्विनी म्हणाली, “अनघा हा समाजातील अशा मुलींचा चेहरा आहे. ज्या मुली घटस्फोटित आहेत आणि डिप्रेशनमध्ये आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत समाजातील महिलांसाठी काम केलं आहे. त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा लग्न करण्याची संधी येते. त्यावेळी स्वतःला शांत करून एका नवीन कुटुंबात समाविष्ट होणं ह्या सगळ्या गोष्टी एका मुलीसाठी कशा असतात हे अनघाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलं आहे. दुःख येत राहतात परंतु त्यामुळे जगणं थांबत नाही हेच सांगण्याच काम अनघाने केलं आहे.”

आणखी वाचा : आराध्या हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून अभिषेक बच्चनने जोडले हात, पाहा Video

आणखी वाचा : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम मायराच्या घरी आलिशान इलेक्ट्रिक कारचे आगमन, किंमत ऐकलीत का?

पुढे अश्विनी म्हणाली, “जशी अनघाच्या आयुष्यात अनेक दुःख संकटं आली तसाच काळ माझ्याही आयुष्यात आला होता. जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा मी आयुष्यात अनेक चढउतार अनुभवले. त्यावेळीही त्यांनी मला एकच गोष्ट सांगितली की, आपण नेहमी कलाक्षेत्रासाठी स्वतःला वाहुन न्यावं जर मी हे करत नसते. तर मी नक्कीच डिप्रेशनमध्ये गेले असते. तुम्ही दुःखी असाल, तुमच्यावर कितीही मोठं संकट जरी आलं तरी तुम्हाला एकच सांगेन की तुम्ही काम सोडू नका. तुम्ही जितके कामात असाल तितके गुंतून राहता आणि वाईट विचार तुमच्यापासून दूर जातात.”

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे अनघाच्या भूमिकेविषयी बोलताना म्हणाली, “अनघाच्या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता मिळाली आहे. आमचं सेटवरच वातावरण देखील खूप छान असतं. मी नेहमी दौऱ्यावर असते, काही सामाजिक कार्यात गुंतलेली असते. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा सेट हेच माझ्यासाठी घर आहे. जिथे मी माझं काम आटोपल्यावर निवांत झोप घेते. सेटवरची कलाकार मंडळी मला खूप साहाय्य करतात, अगदी यश पासून मालिकेचे दिग्दर्शक देखील सेटवर हलकंफूलकं वातावरण निर्माण करतात त्यामुळे हे काम करायला प्रोत्साहन मिळते.”