स्टार प्रवाहवरील सर्वच मालिका या घराघरात लोकप्रिय ठरत आहे. यातील ‘आई कुठे काय करते’ आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिका तर टीआरपीच्या यादीत नेहमीच वर असल्याचे पाहायला मिळतात. पण आई कुठे काय करते आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर भुताचा वावर असल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील खलनायक पात्र साकारणाऱ्या संजना आणि शालिनी यांना विचित्र चेहऱ्याची व्यक्ती दिसल्याचा घटना घडली.

आई कुठे काय करते या मालिकेत रात्री ९ वाजता शूटींग सुरु होते. नाईट शिफ्ट असल्यामुळे सेटवर मोजकेच कलाकार उपस्थित होते. एका सीनसाठी प्रत्येक जण आपापल्या मेकरुपमध्ये तयार होत होते. त्यावेळी संजना ही घाईघाईने सेटवर पोहोचली. संजना तयार होण्यासाठी मेकअप रुममध्ये जात असताना सेटवर अचानक लाईट्स बंद झाले. काही वेळाने पुन्हा सुरु झाले. सुरुवातीला पावसामुळे हे होतं असावं असं संजनाला वाटलं. मात्र हा खेळ काही मिनिटं असाच सुरु राहिला. तेव्हा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“जर अनिरुद्ध सुधारलेला असेल तर…”, ‘आई कुठे काय करते’मधील मिलिंद गवळींची खास पोस्ट

त्यानंतर तिने मदतीसाठी सेटवर प्रोडक्शनच्या लोकांना हाक मारायला सुरुवात केली. पण काही कळायच्या आत संजनासमोर एक विचित्र चेहऱ्याची व्यक्ती समोर आली. या व्यक्तीला पाहून संजनाचा भीतीने थरकाप उडाला. ती जोरजोरात ओरडायला लागली. तिचा आरडाओरडा पाहून सहकलाकार मदतीसाठी धावून आले.

संजनाप्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतंच्या सेटवरही काहीसा असाच किस्सा घडला. शिर्के पाटलांच्या जुन्या वाड्यात शूटिंग सुरु होतं. शालिनीचा सीन सुरु होता आणि अचानक शूटिंगदरम्यान तिला एक अनोळखी व्यक्ती दिसली. अंधारात नेमकं काय घडतंय हे सुरुवातीला तिलाही कळलं नाही. मात्र विचित्र चेहऱ्याच्या या व्यक्तीला पुन्हा पहाताच शालिनीच्या काळजाचा ठोका चुकला.

“दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी

‘आई कुठे काय करते’ आणि ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सेटवर वावरणारी ही व्यक्ती म्हणजे भूत आहे हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून एलिजाबेथचं आहे. नर्सच्या वेशात वावरणाऱ्या या एलिजाबेथला पाहून भीतीने सर्वांचाच थरकाप उडाला. पण ही एलिजाबेथ नेमकी आहे कोण? कुठून आलीय? आणि तिचा हेतू काय आहे? याची उत्तरं प्रेक्षकांना येत्या १७ जुलैला मिळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या रविवारी १७ जुलैला दुपारी १ वाजता बळी चित्रपट प्रवाह पिक्चरवर प्रदर्शित होत आहे. हॉरर-थ्रीलर या चित्रपटात स्वप्निल जोशी आणि पूजा सावंत मुख्य भूमिकेत आहेत. ७ वर्षांचा मुलगा मंदारच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अनेक रहस्यमय घटना आणि त्याचा एलिजाबेथशी असणारा संबंध याचा उलगडा होणार आहे.