कलर्स मराठीवरील मालिका ‘आई मायेचं कवच’ सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. मुलगी आणि आईच्या नात्यावर आधारित असलेल्या या मालिकेनं अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान पक्क केलं आहे. मागच्या काही दिवसांपासून या मालिकेत एका मागोमाग एक अनपेक्षित वळणं येताना दिसत आहेत. मीनाक्षी आपल्या मुलीला सोडवून आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसते. अशातच आता या मालिकेत नव्या चेहऱ्याची एंट्री होणार आहे.
सध्या मालिकेत मीनाक्षी कुंटे आपली मुलगी सुहानीला हर्षद आणि त्याच्या साथीदारांच्या तावडीतून सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्यात या मालिकेत एका नव्या चेहऱ्याची एंट्री झालेली दाखवण्यात आली आहे. या नव्या भूमिकेच नाव मानसिंग असं आहे आणि या भूमिकेत बिग बॉसमधील प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याची एक झलक या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे.
आणखी वाचा- पत्नी जया बच्चनसमोर अमिताभ यांनी रेखा यांना लावला होता रंग, अन्…
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम ‘आई मायेचं कवच’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तो मानसिंग या भूमिकेत दिसणार आहे. नव्या प्रोमोमध्ये विशाल निकमचा या मालिकेतील लुक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. मात्र विशाल निकम या मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणार की सकारात्मक हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.
आणखी वाचा- “प्रसिद्ध व्यावसायिकाच्या पत्नीसोबत सेक्स…” तहसीन पुनावालाचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
दरम्यान मानसिंगच्या एंट्रीमुळे आगामी काळात या मालिकेत बऱ्याच अनपेक्षित घटना घडताना पाहायला मिळणार आहे. पण प्रोमो समोर आल्यानंतर, मानसिंग कोण आहे? त्याच्या येण्यानं मीनाक्षीच्या शोधाला मदत होणार का? की मानसिंगच्या एंट्रीमुळे मीनाक्षीच्या संकटांमध्ये आणखी भर पडणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडलेले आहेत. या मालिकेचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.