छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आमिर अली आणि पत्नी संजीदा शेख यांचा घटस्फोट झाला आहे. काही काळापासून त्यांच्यात अंतर आलं आहे. बऱ्याचकाळा पासून ते दोघे वेगळे राहत असल्याचे म्हटले जातं आहे. मात्र, आमिर किंवा संजीदा या दोघांनीही याबाबत कधीच काही बोलले नाही. या दोघांना त्यांच्या घटस्फोटाची बातमी अधिकृतपणे जाहीर करण्याचीही इच्छा नाही.

मीडिया रिपोर्टसनुसार, या दोघांच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की नऊ महिन्याआधीच यांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी त्यांना कोणत्याही गोष्टी कोणाला सांगण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी कोणाला सांगितलं नाही. तर त्यांची मुलगी आर्याची कस्टडी संजीदाला देण्यात आली आहे.

आणखी वाचा : ‘कपिल शर्मा शो’मध्ये काम केलेल्या ‘या’ अभिनेत्याने केले विष प्राशन!

आणखी वाचा : ‘पंतप्रधानांना जर भेटायची वेळ आली तरी मी…’, बिचुकलेचा व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमिर आणि संजीदाने २०१२ मध्ये लग्न केले होते. या आधी दोघे बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २०२० मध्ये त्यांच्या वैवाहिक जिवनात काही अडचणी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढचं काय तर अशा देखील चर्चा होत्या की त्यांना सरगोसी द्वारा चार महिन्यांची एक मुलगी आहे. मात्र, त्या दोघांनी कधीच यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही.