आपल्या मित्राचा आगामी चित्रपट ‘जय हो’ पाहण्यास आमिर जरा जास्तच उत्सुक झाला आहे. आमिरने ट्विटर आणि फेसबुकवर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा ‘काउंटडाऊन’ सुरु केला आहे.
मित्रा! ‘जय हो’ प्रदर्शित होण्याआधीच दाखव ना- आमिर खान
आमिर रोज ट्विटरवर चित्रपटाबाबत ट्विट करत आहे. तसेच, त्याने प्रदर्शनापूर्वीच आपल्याला चित्रपट दाखविण्याचा आग्रही केला. “जय हो येण्याची वाट बघतोय मी सलमान! रिलीज से पेहेले दिखादे मेरे भाई”, असे ट्विट त्याने केले होते.
बिग बॉस ७ या सेलिब्रिटी रिअॅलिटी शोमध्ये सलमानने आमिरच्या धूम ३चे प्रमोशन केले होते. आता आमिर त्याची मैत्री निभावत आहे.