scorecardresearch

“मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

aamir khan, nagraj manjule, jhund,
नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘सैराट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आता त्यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नावं झुंड आहे. हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागराज मंजुळे, टी सीरिजचे भूषण कुमार आणि चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर आमिरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

‘झुंड’ हा आतापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट पाहताना आमिरला अश्रू अनावर झाले. चित्रपटाचा शेवट झाल्यानंतर स्क्रिनिंगला उपस्थित असलेल्या सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. “चित्रपट पाहून मी नि:शब्द झालोय. तुम्ही भारतीय मुलामुलींच्या भावनांना ज्याप्रकारे पडद्यावर दाखवलंय, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. चित्रपटात मुलांनी तर अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपटाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे. हा चित्रपट पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. आम्ही २०-३० वर्षात जे शिकलो त्याचा तर तुम्ही फुटबॉल केला”, असं आमिर नागराज यांना म्हणाला.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : “खरंच प्रार्थना पूर्ण होतायेत असं वाटतंय…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

पुढे आमिर म्हणाला, “अमिताभ यांनी आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यांच्या करिअरमधला हा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. यानंतर आमिरने चित्रपटातल्या कलाकारांची भेट घेतली. सगळ्या कलाकारांना भेटल्यानंतर आमिरने त्या मुलांना त्याच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.”

सगळे घरी आल्यानंतर आमिर नागराज मंजुळे यांना म्हणाला की, “मी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. यावेळी मी मराठी चित्रपट का केला नाही यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मी म्हणालो की मला नागराज मंजुळेने विचारलं तर मी नक्कीच करेन. त्या मुलाखतीत मी तुमच्या बद्दलही बोललो आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2022 at 13:40 IST

संबंधित बातम्या