आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’या रियालिटी शोमुळे अनेकांच्या आयुष्यात नवी उमेद, नवा प्रकाश निर्माण झाला. सामाजिक प्रथेविरुद्ध लढणा-या आणि समाजातील अन्यायाविरुद्ध उभ्या राहणा-या अनेकांना या शोद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि अनुभव शेअर करण्यासाठी मंच मिळाला. ‘सत्यमेव जयते’च्या शोधकर्ता चमूने आपले काम पुन्हा सुरू केले असून, याचे पुढील पर्व २०१४च्या सुरवातीला सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमीर खान ‘धूम ३’च्या प्रसिद्धी कार्यक्रमाबरोबरच या शोचे चित्रीकरण करत असल्याच्या अफवा देखील उठत आहेत.