छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ आजवर या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गायकांचे शोने संपूर्ण आयुष्य बदले. इंडियन आयडल ही स्पर्धा जिंकणारे गायक सध्या चांगलेच लोकप्रिय आहे. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. अभिजीत सावंतचे आयुष्य रातोरात बदलले होते. इंडियन आयडलचे पहिल पर्व जिंकल्यानंतर त्याला काही रक्कम मिळाली होती. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान तो त्याच्या जिंकलेल्या रकमेबद्दल बोलताना दिसला होता, “त्याने ती रक्कम कुठे वापरली आणि त्याचे समाधान का झाले नाही” याबाबतची माहिती दिली होती.

इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर तुला काही ठराविक रक्कम मिळाली होती, त्याचे तू काय केलंस? असा प्रश्न त्याला एका मुलाखतीदरम्यान विचारला होता. त्यावेळी अभिजीत म्हणाला, “मी त्या रक्कमेची उत्तम गुंतवणूक केली होती. २००८ ला आर्थिक मंदीदरम्यान आम्ही पैशांची बचत केली होती. त्यातून आम्ही काही ठिकाणी गुंतवणूक केली होती. काही वर्षांपूर्वी मी एक घर खरेदी केले. पण आता मात्र मला याचा पश्चाताप होतं आहे,” असे त्याने सांगितले.

“कोरोना काळात मी माझ्या गाण्यांमुळे फार असमाधानी होतो. त्यावेळी सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या. पैसे मिळत होते. पण त्यावेळी मी फार असमाधानी होतो. जेव्हा तुम्ही पैशांच्या मागे धावत असता, त्यावेळी तुम्हाला तुमची प्रतिभा, तुमचे संगीत, तुमचे ज्ञान यासारख्या अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते,” असेही तो म्हणाला.

अभिजीतने इंडस्ट्रीतील शो-ऑफ संस्कृतीबद्दलही भाष्य केले. यावेळी त्याने कबूल केले की त्यालाही यापुढे झुकावे लागतं, असेही अभिजीत सावंतने सांगितले. अभिजीत इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. सध्या तो लाइमलाइटपासून लांब असल्याचे पाहायला मिळते.