मोहब्बतें लुटाऊंगा हे गाणं ऐकलं तरीही आपल्या डोळ्यासमोर लोकप्रिय गायक अभिजीत सावंत हे नाव येते. या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सावंत आजही अनेकांच्या लक्षात आहे. अभिजीत सावंत हा इंडियन आयडल या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचला. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. नुकतंच त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्याने मराठी संस्कृतीबद्दल थेट भाष्य केले.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. यामुळे त्याचे आयुष्य रातोरात बदलले होते. अभिजीत सावंतला नुकतंच मराठी संस्कृती, करिअर याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने त्याला याचा काय फायदा झाला आणि काय तोटा झाला याबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “मी गायब झालोय असं रोज वाचनात येतं पण…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतने सांगितली सत्य परिस्थिती

Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

अभिजीत सावंतने नुकतंच ‘बीबीसी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला. यावेळी अभिजीत सावंत म्हणाला, “मला संगीत क्षेत्रात करिअर करायचे होतं. पण तेव्हा ते फार अवघड होतं. माझे आई-वडील संगीत क्षेत्रातील नसल्यामुळे मला तसं वाटत होतं. मी गणपती, नवरात्री या सारख्या कार्यक्रमात गाणी म्हणायला सुरुवात केली. छोट्या छोट्या सोसायटीमध्ये जाऊन मी माझे शो करायचो. त्यातून माझी थोडीफार कमाई व्हायची. मी इतका प्रसिद्ध होईन, या उंचीवर जाईन असे अजिबात वाटत नव्हते.”

“पण मी मराठी असल्याचा मला खूप फायदा झाला. मराठी संस्कृती याचाही मला फायदा झाला. कारण मराठी कलाकारांना कधीच जास्त प्रसिद्धी दिली जात नाही. त्यांन जास्त उडू दिलं जात नाही. त्या सर्वांनाच ठिक आहे, असंच म्हटलं जातं”, असेही अभिजीतने सांगितले.

आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा

“मला आजही आठवतंय की मुंबईतील दादर परिसरात इंडियन आयडलच्या ऑडिशन्स सुरु होत्या. त्यावेळी तिथे फार कमी लोक आले होते. कारण हा शो नेमका काय, त्यात काय असणार याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मी ऑडिशन दिली. त्यानंतर याचं हळूहळू प्रमोशन सुरु झालं. तेव्हा सगळ्यांना समजलं की हा खूप मोठा शो आहे. अशाप्रकारे छोट्या स्टेजवरुन मी इंडियन आयडलच्या मोठ्या स्टेजवर आलो”, असे अभिजीत सावंतने म्हटले.