छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खाजगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्वेताने तिच्या दोन्ही लग्नांविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. तिला आणि तिच्या दोन्ही मुलांना कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागला. या सगळ्यागोष्टी श्वेताने सांगितल्या. आता श्वेताचा पुर्वाश्रमीचा पती म्हणजेच अभिनव कोहलीने यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, “काही गोष्टींवर मी काय बोलू याचा विचार मी करत आहे. मी माझ्या मुलासाठी लढत आहे, मी स्वत:साठी लढत नाही. श्वेता माझ्याशी अमानुषपणे वागली. खरं सांगायचं तर, लोकांशी बोलताना अजूनही माझ्या डोळ्यात अश्रू येतात, कारण श्वेताने माझा अमानुषपणे छळ केला. पण मी स्वत:साठी लढत नाही. ‘तू जे करत आहेस ते चुकीचे आहे. तू माझ्यासोबत जे काही केले ते तू विसरलीस,’ असे मला श्वेताला सांगायचे आहे. तिने २ दिवसांसाठी मला तुरूंगात चुकीच्या गोष्टीसाठी ठेवलं. त्यानंतर श्वेताची मुलगी पलक दुसऱ्या दिवशी पोस्टकरून सांगते की त्याने माझ्यावर लैंगिक गैरवर्तन केलेले नाही,” असे अभिनव म्हणाला.
अभिनव पुढे म्हणाला, “तिने नंतर ती पोस्ट काढून टाकली. जेव्हा पलकने लिहिलेले ती पोस्ट मी रिपोस्ट केले तेव्हा तिने पुन्हा माझ्यावर गुन्हा दाखल केला. माझ्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तिने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. तो दिवस भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. हे माहित असून ती रात्र मी कोठडीत घालवावी अशी तिची इच्छा होती. श्वेताने माझ्यासाठी जे केले ते अमानुष आहे. जेव्हा मी आमच्या मुलाची काळजी घेण्यात व्यस्त होतो, तेव्हा ती मीडियासमोर माझी बदनामी करत होती”
काय म्हणाली होती श्वेता?
तिसऱ्यांदा लग्न करण्याऐवजी लोकांनी तिला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. फक्त एवढंच नव्हेतर श्वेताला आणि तिच्या मुलीला पलकला लोक कशा प्रकारे ट्रोल करतात या बद्दल तिने सांगितले होते. एक पोस्टकरून तिची इमेज खराब करण्याची धमकी तिला अभिनव कोहलीने दिली होती.