विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात. या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असली तरी त्याच्यातील प्रेम अद्याप कायम आहे. पण तुम्हाला माहितीये का? अभिषेक बच्चन याचा ऐश्वर्यापेक्षा एका दुसऱ्याच व्यक्तीचा फार मोठा चाहता आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत त्याने याबाबत खुलासा केला होता.

अभिषेक बच्चन काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले होते. “मी गायक आणि रॅपर नेली यांचा फार मोठा चाहता आहे. नेली यांचे २००२ मध्ये प्रदर्शित झालेले डायलेमा (Dilemma) हे गाणे आजही माझे तितकेच आवडीचे आहे. मला आजही ते गाणे प्रचंड आवडते. मी नेली या अमेरिकन गायक-रॅपरचा फार मोठा चाहता आहे.”

यापुढे अभिषेक म्हणाला की, “हे गाणे माझे आणि ऐश्वर्याचे आहे. एकदा तर ऐश्वर्याने माझ्यासाठी गिफ्ट घ्यायचे म्हणून मला फार मौल्यवान वस्तू दिली होती.”

हेही वाचा : लग्नानंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल कोणाचे शेजारी होणार माहितीये का? नाव वाचून बसेल धक्का!

“त्यावेळी मी आणि ऐश्वर्या एकमेकांना डेट करत होतो. त्यावेळी तिला मला एक भेटवस्तू द्यायची होती. तिची ही भेट आजही सांभाळून ठेवली आहे. तिने माझा आवडता गायक नेलीला त्याच्या माईकवर ऑटोग्राफ देण्यास सांगितले होते. तो ऑटोग्राफ असलेला माईक मी आजही सांभाळून ठेवला आहे. आजही तो माझ्या टेबलावर ठेवला आहे. तो फार सुंदर आहे,” असे अभिषेक म्हणाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिषेक आणि ऐश्वर्याने २००९ मध्ये लग्न केले. त्या दोघांनी लग्नाआधी जवळपास ६ चित्रपटांमधये एकत्र काम केले आहे. अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘द बिग बुल’ या चित्रपटामध्ये दिसला होता. ‘बॉब बिस्वास’ आणि ‘दसवी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.