scorecardresearch

Premium

अभिषेकने बिग बींसोबत साम्य दाखवणारी पोस्ट केली शेअर, नेटकरी म्हणाले…

अभिषेकने केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत.

abhishek bachchan, amitabh bachchan,
अभिषेकने केलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत.

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिषेक सध्या बॉब बिस्वास या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिषेकने अमिताभसोबतचे काही फोटो कोलाज करून शेअर केले आहेत. यात अभिषेक हा अमिताभ यांच्या सारख्या काही गोष्टी करत असल्याचे दिसते. या फोटोंमध्ये अमिताभ आणि अभिषेक हुबेहुबे दिसत आहेत. हा फोटो शेअर करत वडिलांसारखाच मुलगा! माझी प्रेरणा, असे कॅप्शन अभिषेकने दिले आहे.

Nitin Gadkari Favourite mirchi cha Thecha
Video: नितीन गडकरींना आवडतो झणझणीत मिरचीचा ठेचा, स्वत:च सांगितली रेसिपी
Women do not do any Creative work Job rejection letter sent by Walt Disney to woman in 1938 goes viral
“महिला सर्जनशीलतेने काम करत नाही..”; १९३८ मध्ये वॉल्ट डिस्नेने नाकारला होता महिलेचा नोकरीचा अर्ज, ते Rejection Letter आले चर्चेत
lakhpati didi scheme
विश्लेषण : निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केलेली ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?
Vodafone Idea to launch 5G in India With In six To Seven Months And Airtel And Jio plan prices announce soon
अखेर प्रतीक्षा संपली! Vi चे 5G नेटवर्क होणार लॅान्च; एअरटेल अन् जिओबरोबर करणार स्पर्धा

त्याच्या चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत त्या दोघांमध्ये साम्य असल्याचे म्हटले आहे. एक नेटकरी म्हणाला, “तू आणि अमिताभ सर सारखे दिसतात. जरी तुमच्या यशाचे प्रमाण हे कमी जास्त असले आणि ट्रोलर्स तुमच्यात तुलना करत असले तरी तुमच्या कुटुंबात असलेले चांगले संबंध पाहून खरोखर आनंद होतो.” दुसरा नेटकरी म्हणाला, “त्यांनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच यश मिळवले होते, परंतु तुला ते आता मिळेल.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abhishek bachchan shares like father like son post for amitabh bachchan fan points out their different success rate dcp

First published on: 13-12-2021 at 11:52 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×