प्रसिद्ध दिग्दर्शक जे पी दत्ता यांनी त्यांच्या आगामी ‘पलटन’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करून अवघे तीन महिने झाले. युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या चित्रपटात अनेक कलाकार दिसणार असून, त्यात अभिषेक बच्चन याचीही भूमिका आहे. पण, शेवटच्या क्षणाला अभिषेकने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, जेपी फिल्मसची निर्माती निधी दत्ता हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : सिने‘नॉलेज’ आमिरने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या भूमिकेचे नाव काय?

निधी म्हणाली की, काही वैयक्तिक कारणांमुळे अभिषेक आता ‘पलटन’मध्ये काम करत नाहीये. त्याने त्याबद्दल आम्हाला काहीही सांगितलेले नाही. आमची संपूर्ण टीम चित्रीकरणासाठी लडाखला जाण्यासाठी अवघे २४ तास बाकी असताना त्याने काम करण्यास नकार दिला. हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. पण, त्याच्या भावी आयुष्यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. आता आमची टीम लडाखमध्ये असून, आम्ही चित्रीकरणास सुरुवात केलीय. लवकरच आम्ही अभिषेकऐवजी घेण्यात येणाऱ्या अभिनेत्याचे नाव जाहीर करू.

जे पी दत्ता यांच्या ‘रिफ्यूजी’ चित्रपटाने अभिषेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर या दोघांनी ‘एलओसी कारगिल’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटांमध्येही एकत्र काम केले.

वाचा : ‘डान्स प्लस ३’च्या विजेत्या बीर राधा शेर्पाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करताना जे पी दत्ता म्हणालेले की, ‘आपल्या देशाचा इतिहास सांगणारी काही रिअल लाइफ हिरोंना सलाम करणारी एक नवी कथा आणण्याची वेळ झाली आहे. माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या ‘पलटन’ चित्रपटाची घोषणा मी करतो.’

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan walks out of jp duttas paltan
First published on: 25-09-2017 at 09:23 IST