actor ajay devgn teases drishyam 2 as he shares pics from his 2015 film drishyam spg 93 | | Loksatta

अजय देवगणला येतेय दृश्यमची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला….

‘दृश्यम’ चित्रपटात अजयने विजय साळगावकरची भूमिका केली आहे.

अजय देवगणला येतेय दृश्यमची आठवण, फोटो शेअर करत म्हणाला….
bollywood film

बॉलिवूडचा सिंघम म्हणून ओळखणारा जाणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण . गेली अनेकवर्ष अजय देवगण प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक असा तिन्ही भूमिकांमधून तो आपल्या भेटीस येतो.अजय देवगणचा थँक गॉड चित्रपट सध्या चर्चेत आहे. अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मुळे खूप चर्चेत आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असतानाच अजय सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांच्याबरोबर ‘थँक गॉड’च्या प्रदर्शनाची तयारी करत आहे. अशातच अजय देवगणने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही फोटोस शेअर केले आहेत. ज्यावर त्याने कॅप्शन दिला आहे की काही जुनी बिलं.

फोटोमध्ये स्टॉरंटचे बिल, स्वामी चिन्मयानंदजींच्या महा सतंगची सीडी, बसचे तिकीट आणि चित्रपटांची तिकिटे या सर्वांच्या तारखा ३ ऑक्टोबर २०१४ होत्या. नेटकऱ्यांनी लगेचच या पोस्टवर कॉमेंट्स करण्यास सुरवात केली. एकाने लिहले की दृश्यम हा बॉलिवूडने केलेल्या सर्वोत्तम रिमेकपैकी एक आहे. आशा आहे की दुसरा भागही तितकाच चांगला असेल.” दुसरा चाहता म्हणाला, “दृश्यम २ची आतुरतेने वाट पाहत आहे.”

“माझे विवाहित मित्र माझ्याबरोबर… ” तारक मेहता फेम मुनमुन दत्ताचा खुलासा

‘दृश्यम’ चित्रपटात अजयने विजय साळगावकरची भूमिका केली आहे. मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याचा चुकून त्यांच्याकडून खून होतो. या घटनेतून वाचण्यासाठी अजय कुटुंबाचे रक्षण करतो. मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर, विजय पुराव्याच्या सर्व खुणा काढून टाकतो आणि नंतर पणजीला कौटुंबिक सहलीला जातो. ते एका आश्रमाला भेट देतात, चित्रपट पाहतात आणि रेस्टॉरंटमध्ये खातात, अशी एका कथा रचतो.

‘दृश्यम’ हा निशिकांत कामत दिग्दर्शित क्राईम थ्रिलर आहे. अजय व्यतिरिक्त यात तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर आणि ऋषभ चढ्ढा यांच्याही भूमिका आहेत. दृश्यम २ हा सिक्वेल, अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केला आहे आणि तो १८ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 15:27 IST
Next Story
“माझा धर्मच…” बरीच वर्ष चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याबाबत स्पष्टच बोलला सैफ अली खान