अभिनेता अक्षय कुमारचे ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ यांसारखे काही चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित झाले. त्याचे अलिकडेच प्रदर्शित झालेले हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मात्र सुपरफ्लॉप ठरले. सुपरफ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. खिलाडी कुमारचा ‘राम सेतु’ येत्या दिवाळीला सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. पण त्यापूर्वी चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘राम सेतु’चा टीझर प्रदर्शित
अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘राम सेतु’चा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षयचा एक नवा लूक पाहायला मिळत आहे. काही सेकंदाच्या या टीझरमध्ये दमदार अ‍ॅक्शन सीन्स पाहायला मिळत आहेत. तसेच चित्रपटाचा टीझर पाहून हा बिग बजेट चित्रपट असल्याचं दिसून येतं.

पाहा टीझर

“राम सेतू को बचाने के लिए हमारे पास सिर्फ तीन दिन है” या अक्षयच्या संवादाने टीझरची सुरुवात होते. त्यानंतर अ‍ॅक्शन सीन्सची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये काम करताना दिसेल. चित्रपटाच्या टीझरमध्ये जॅकलिनच्या लूकची झलक पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारने अंधेरीतील घर कोट्यवधी रुपयांना विकलं; बॉलिवूडमधील ‘हा’ प्रसिद्ध संगीतकार नवा मालक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षयच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केलं आहे. रामायणापासून प्रेरित होऊन या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली आहे. अभिनेत्री नुसरत भरुचाही चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा टीझर पाहिल्यानंतर ब्लॉकबस्टर टीझर, अक्षय कुमार इज बॅक अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.