अभिनेता आर. माधवन याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही खूप नाव कमावले आहे. आर. माधवनच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ या चित्रपटाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच आठवडे उलटले आहे. मात्र तरीही त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे ओटीटीवरही हा चित्रपट ट्रेंडींगवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

आर. माधवन सध्या या चित्रपटातून मिळालेल्या यशाचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. यामुळे आर. माधवनच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने सलमान खान, शाहरुख खान यांना मागे टाकत एक नवा विक्रम केला आहे.

colors marathi announces new marathi serial abeer gulal
नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर
Laapataa Ladies on OTT
किरण रावचा ‘लापता लेडीज’ ओटीटीवर आज होणार प्रदर्शित, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार? जाणून घ्या
web series released on OTT this week
वीकेंडचा प्लॅन नाही? ओटीटीवर घरबसल्या पाहा ‘हे’ सिनेमे अन् वेब सीरिज, याच आठवड्यात झालेत प्रदर्शित
govinda attended niece Arti singh wedding
Video: मामा-भाच्याचं वैर, पण भाचीच्या लग्नाला पोहोचला गोविंदा; आरती सिंहबद्दल म्हणाला…

आणखी वाचा : “बेबीबंप किती, बाळाची काळजी कशी घेणार यावर चर्चा करणं थांबवा”, आलिया भट्ट ट्रोलर्सवर संतापली

आर. माधवनचे तीन चित्रपट आयएमडीबीच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही चित्रपटांनी टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या यादीत ‘रॉकेट्री’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर त्याचा २००३ साली प्रदर्शित झालेला ‘अंबे शिवम’ आणि सातव्या क्रमांकावर २००९  मधील ‘३ इडियट्स’ चित्रपट आहे.

हेही वाचा : विद्यार्थीनीलाच करत होता डेट; ‘अशी’ आहे आर माधवनची प्यार वाली लव्ह स्टोरी

त्यामुळे या यादीत सलमान, शाहरुखला मागे टाकत हा विक्रम नोंदवणारा आर माधवन हा पहिला अभिनेता ठरला आहे. आर माधवनच्या या कामगिरीबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आर. माधवनचा ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट १ जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला चाहत्यांसह अनेक स्टार्सचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात तो इस्रोचे एरोस्पेस इंजिनियर नांबी नारायणन यांच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाला सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अनेक चाहते त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.