Actor Kiran Abbavaram-Actress Rahasya Gorak got Married: प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने काही महिन्यांपूर्वी गुपचूप साखरपुडा उरकला होता. त्यानंतर आता त्याने दोन दिवसांआधी गुपचूप लग्न केलं, अशी माहिती समोर आली आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याने कर्नाटकमधील कूर्ग याठिकाणी लग्न केलं. त्याची पत्नीही अभिनेत्री आहे.

अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. या दोघांनी २०१९ मध्ये ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी १३ मार्च रोजी एका खासगी सोहळ्यात साखरपुडा केला होता. हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. आता या जोडप्याने गुपचूप लग्न उरकलं आहे. किरणने लग्नाचे फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली.

vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
salmon sperm facial
‘सॅल्मन स्पर्म फेशियल’ काय आहे? हॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये याची लोकप्रियता का वाढतेय?
‘हे’ दोन बॉलीवूड सुपरस्टार आहेत डेटिंग अ‍ॅपवर, उर्वशी रौतेलाचा मोठा दावा, एक लोकप्रिय अभिनेत्रीसह आहे नात्यात
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Famous writer and director Madhura Jasraj passed away
प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका मधुरा जसराज यांचे निधन
salman khan sangeeta bijlani marriage broke
जिच्यामुळे मोडलं सलमान खान-संगीता बिजलानीचं लग्न, तिनेच सांगितलं ‘त्या’ दिवशी काय घडलं होतं?
Kareena Kapoor Khan taimur ali khan
Video : “मी लोकप्रिय आहे का?” तैमूर आई करीनाला विचारतो प्रश्न, ती काय उत्तर देते? जाणून घ्या

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक आता पती पत्नी झाले आहेत. त्यांनी गुरुवारी (२२ ऑगस्ट रोजी) कूर्गमध्ये एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. जवळपास चार वर्षांपासून ते डेट करत होते. चार वर्षे आपलं नातं गुपित ठेवल्यानंतर या जोडप्याने मार्च महिन्यात साखरपुडा केला. त्यानंतर आता हे दोघेही पती पत्नी झाले आहेत.

सत्य घटनांवर आधारित ‘या’ १२ सुपरहिट भारतीय वेब सीरिज तुम्ही पाहिल्यात का? OTT वर आहेत उपलब्ध

चाहते किरण-रहस्याला देतायत शुभेच्छा

किरण व रहस्याच्या लग्नात दोघांच्या कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित होते. तसेच या जोडप्याच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी लग्नाला हजेरी लावली होती. किरण व रहस्या यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये या जोडप्याने सोनेरी रंगाचे कपडे लग्नाच्या या खास दिवसासाठी निवडल्याचं दिसत आहे. दोघेही लग्नात कमालीचे सुंदर दिसत होते. फोटो समोर आल्यानंतर नेटकरी या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत व त्यांना सहजीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.

‘शाका लाका बूम बूम’ मालिकेतील संजूचा झाला साखरपुडा, होणारी बायको आहेत तरी कोण? जाणून घ्या…

रहस्या व किरणचे चित्रपट

किरणने ‘एसई कल्याणमंडपम’, ‘सम्माथमे’, ‘रुल्स रंजन’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान, ‘रुल्स रंजन’मध्ये शेवटचा दिसलेला किरण पीरियड ॲक्शन थ्रिलर ‘का’ मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात किरणची पत्नी म्हणजेच रहस्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित सुजित आणि संदीप करणार आहेत.