Rajinikanth Receivs Bomb Threat :दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासंबंधित एक बातमी समोर येत आहे आणि ती म्हणजे रजनीकांत यांचं घर बॉम्बस्फोटानं उडवण्याची धमकी. सोमवारी सकाळी पोलिसांना रजनीकांत यांच्या पोएस गार्डन येथील घराच्या इथे बॉम्ब ठेवला असल्याचा धमकीचा ईमेल आला.
बॉम्ब असल्याची माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब निकामी करणारे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तपासणीनंतर हे ई-मेल खोटे असल्याचे समोर आले.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, तमिळनाडूतल्या डीजीपी कार्यालयाकडून हा ई-मेल आला होता, ज्यात दावा करण्यात आला होता की, रजनीकांत यांच्या घरात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी लगेच याबद्दल चौकशी केली. नंतर तैनमपेट पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली.
त्यानंतर टीमनं संपूर्ण घर आणि आजूबाजूच्या परिसराची सखोल तपासणी केली. त्या तपासणी व चौकशीदरम्यान पोलिसांना कुठलीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही. त्यानंतर पोलिसांनी ईमेल खोटे असल्याचे जाहीर केले.
बॉम्ब ठेवल्याच्या ठिकाणची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी केली. पण पोलिसांना संशयास्पद असं काहीच मिळालं नाही. तरी, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. रजनीकांत यांना ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरु आहे. सायबर क्राइम सेलही यामध्ये सहभागी झाली आहे आणि ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्याचं काम करत आहेत.
बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीनंतर सुरक्षेत वाढ
या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. ररजनीकांत यांचा पोएस गार्डन येथील बंगला चेन्नईतील सर्वांत सुरक्षित ठिकाणांपैकी आहे. मात्र, अशा ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या ई-मेलनंतर या ठिकाणी आणखी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
अभिनेता थलपती विजयलाही आलेला धमकीचा ई-मल
दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला अभिनेता व तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचा प्रमुख विजयच्या घरीही बॉम्ब ठेवल्याचा धमकी देणारा ई-मेल आला होता. मात्र, हा धमकीचा मेलही फेक असल्याचं पोलिस तपासात पुढे आलं होतं. सध्या पोलिस अशा धमक्या देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत आणि सतत मिळणाऱ्या या अफवांमुळे सुरक्षा यंत्रणाही अधिक सतर्क झाल्या आहेत.
