‘न्यूड फोटोशूट’प्रकरणी रणवीर सिंगला मुंबई पोलिसांकडून समन्स

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे एकच वादंग माजले.

‘न्यूड फोटोशूट’प्रकरणी रणवीर सिंगला मुंबई पोलिसांकडून समन्स
रणवीर सिंग (संग्रहित फोटो)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे एकच वादंग माजले. त्याच्या या फोटोंना पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. काहींनी रणवीरला पाठिंबा दिला. तर काहींनी त्याच्यावर टीका केली. याच प्रकरणात रणवीर सिंगवरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत चेंबूर पोलिसांनी रणवीरला समन्स बजावले आहे. समन्सअंतर्गत येत्या २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश रणवीरला देण्यात आले आहेत. रणवीर सध्या मुंबईबाहेर आहे. त्यामुळे येत्या १६ ऑगस्ट रोजी ही नोटीस त्याला सोपवली जाणार आहे.

हेही वाचा >> लेकीच्या लग्नासाठी सोनालीच्या आईने पहिल्यांदाच केली ‘ही’ गोष्ट

मिळालेल्या माहितीनुसार न्यूड फोटोशूटप्रकरणी रणवीर सिंगविरोधात मुंबईमध्ये एक महिला वकील आणि एका खासगी संस्थेच्या पदाधिकाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर चेंबूर पोलिसांनी रणवीरला समन्स बजावले आहे. या समन्समध्ये २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा >> अक्षय कुमारच्या ‘रक्षाबंधन’वर ट्विंकल खन्नाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली “चित्रपटाचा पूर्वार्ध हसवतो, पण नंतर…”

नेमके प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी रणवीर सिंगने पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रणवीरवर जोरदार टीका करण्यात आली होती.तर बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला. नंतर रणवीरविरोधात मुंबईत एका खासगी संस्थेने तसेच महिला वकिलाने पोलिसात तक्रार दिली होती. रणवीरने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे महिलांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या एनजीओकडून करण्यात आला आहे.

रणवीरच्या या फोटोशूटनंतर देशाच्या राजकारणातही याचे पडसाद उमटले होते. समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र चीफ अबू आझमी यांनी रणवीरच्या या फोटोशूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये, “जर लोकांसमोर न्यूड होणं ही कला आणि स्वतंत्र्य असेल तर मग बुरखा परिधान करणं ही महिलांवर जबरस्ती का आहे?” असा सवा ल त्यांनी केला होता.दरम्यान, मुंबई पोलिसांनी बजावलेल्या या समन्सनंतर रणवीर सिंग पोलिसांसमोर हजर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
लेकीच्या लग्नासाठी सोनालीच्या आईने पहिल्यांदाच केली ‘ही’ गोष्ट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी