scorecardresearch

“असं पाहिजे नातं…” ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

त्यासोबत त्याने त्याच्या खास मित्राला ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“असं पाहिजे नातं…” ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने श्रेयस तळपदेसाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
संकर्षण कऱ्हाडे श्रेयस तळपदे

मैत्रीचा बंध हा आयुष्यातील सर्वात घट्ट बंधनांपैकी एक आहे. आपल्या कुटुंबाइतकेच आपल्या आयुष्यात खास स्थान असणार्‍या काही व्यक्ती म्हणजे आपले मित्र! खरं तर ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा हा स्पेशल दिवस ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जात आहे. या निमित्ताने नुकतंच मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने त्याच्या खास मित्राला ‘फ्रेंडशिप डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच संकर्षणने अभिनेता श्रेयस तळपदेला मैत्रीच्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्याने श्रेयसचा आणि त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची अचानक एक्झिट!

“आम्ही दोघं दोस्त मिळून, सगळं जग जिंकू… असं पाहिजे नातं, हळद आणि कुंकू…”, असे संकर्षण कऱ्हाडेने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. त्याने या आगळ्यावेगळ्या पोस्टद्वारे श्रेयसला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे. यावर प्रार्थनाने हातांनी टाळी वाजवताना आणि हार्ट असलेला इमोजी शेअर केला आहे.

Photos : संकर्षण कऱ्हाडेच्या भावाला पाहिलात का? लवकरच झळकणार ‘या’ लोकप्रिय मालिकेत

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत समीर हे पात्र साकारत आहे. या मालिकेत संकर्षण आणि श्रेयस यांची मैत्री प्रचंड घट्ट दाखवण्यात आली आहे. त्यांची जोडी ही प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडत आहे. संकर्षण कऱ्हाडे हा ‘तू म्हणशील तसं..’ या नाटकातही मुख्य भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actor sankarshan karhade share friendship day special post for shreyas talpade nrp