ठाण्यात शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सध्या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे अनेक पोस्टर, टिझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकांनी या चित्रपटाची स्तुती केली आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल अभिनेता संतोष जुवेकरच्या आईने प्रतिक्रिया दिली आहे.

संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर आईचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याची आई प्रसाद ओकची भूमिका असलेला धर्मवीर चित्रपट बघून आल्यानंतरची प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यावेळी त्याच्या आईच्या हातात मोबाईल असून ती त्यावर धर्मवीरचे पोस्टर पाहात असल्याचे दिसत आहे. यात ती ते पोस्टर पाहून भावूक प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का, ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढाने सोडली मालिका?

संतोष जुवेकरच्या आईची प्रतिक्रिया

“प्रसादने इतकं सुंदर काम केलं आहे की माझे डोळे भरुन आले. आज प्रत्यक्ष आनंद दिघेच आलेत की काय असं वाटलं. मी प्रत्यक्ष आनंद दिघेंना बघितलं आहे, त्यामुळे तो नक्कीच तसाच दिसतो. मी चित्रपट पाहिला, तो बघितल्यानंतर हुबेहुब आनंद दिघेच आलेत की काय असंच वाटलं डोळे भरुन. खरंतर त्याच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आले ते खरोखरच आलं. पण माझे डोळेही तितकेच वाहत होते. त्याने इतकं काम सुंदर मिळालं आणि त्यानेही ते केलं. त्याचे मी वादळवाटपासून सर्व भूमिका बघितल्या आहेत.

संतोष, प्रसादने इतकं सुंदर काम केलं, असं कोणीही केलेलं नाही. संतोष तू खरच चित्रपट पाहायला जा. मी परत एकदा मैत्रिणींना घेऊन जाऊन बघणार आहे. प्रसादला मंजूने फार साथ दिली आणि ज्याच्या मागे बायको उभी आहे त्याचा काय प्रश्नच नाही. चित्रपटाला नाव ठेवण्यासारखं काहीही नाही. त्याने इतकं सुंदर काम केलं आहे. संतोष मला तर परत तुझ्यासोबत जाऊन बघावसं वाटतोय.

प्रसादला मी इतकंच सांगेन की मला तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा भेटायचं आहे. त्यावेळी तुला कडकडून मिठी मारायची आहे. खरंच पश्या तू खरचं खूप मस्त काम केलं. आनंद दिघेंचे नाव मिळणे म्हणजे सात जन्म, सात पिढ्यांना नाही मिळणार एवढं तू त्यांचं नाव मिळवलं आहे. मी काय बोलू मला काहीही सुचत नाही. प्रसाद तू भाग्यवान आहेस. असाच पुढे जात राहा, माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तुझ्या आई वडिलांचे तर आशीर्वाद आहेत पण माझेही आहेत. प्रसाद खरंच लवकर मला भेट…”, असे त्या या व्हिडीओत म्हणाल्या.

बॅडमिंटनच्या थॉमस चषकाचं विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा प्रशिक्षक आहे तापसी पन्नूचा बॉयफ्रेंड, खास पोस्ट शेअर करत म्हणाली…

संतोष जुवेकरने या व्हिडीओला हटके कॅप्शन दिले आहे. “पश्या बघ काय कमावलंयस तू. माझी आई आज तिच्या आनंद दिघे साहेबांना बघून आली”, असे त्याने कॅप्शन देताना म्हटले आहे. तसेच त्याने हा व्हिडीओ प्रसाद ओक, मंजिरी ओक, प्रवीण तरडे यांसह संपूर्ण चित्रपटाच्या टीमला टॅग केला आहे.

संतोष जुवेकरचा हा व्हिडीओ पाहून मंजिरीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “काकू किती किती बरं वाटलं हे बघू…खूप आभार. संत्या चोमड्या बायकोचं सोडा का रे? त्यांचं आहे माझ्यावर प्रेम. तुला काय त्रास होतोय? पण तरीही खूप खूप प्रेम”, असे तिने म्हटले आहे.

दरम्यान धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या “धर्मवीर मुक्काम पोस्ट – ठाणे” हा चित्रपट महाराष्ट्रातील ४०० हून अधिक स्क्रिन्स आणि १० हजारहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकताना पाहायला मिळत आहे.