२०२१ मध्ये ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला. मराठमोळ्या श्रेयस तळपदेने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता. श्रेयस तळपदे याने केलेल्या या कामाचं खूप कौतुक झालं. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठीदेखील तो अल्लू अर्जुनच्या भूमिकेच्या हिंदी व्हर्जनला आवाज देणार आहे. श्रेयसने मराठी-हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याच्या मेहनतीचं फळ म्हणून त्याला एका बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे.

अभिनेता श्रेयस तळपदे गेली अनेक वर्षं मराठी, हिंदी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याने आतापर्यंत केलेल्या सर्व कामांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. श्रेयसचं फॅन फॉलोइंग खूप मोठं आहे. तो कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. तर आता मराठी आणि हिंदीनंतर तो दाक्षिणात्य चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे.

आणखी वाचा : रेशीमगाठ कायम राहणार! मालिका संपताना प्रार्थना बेहरे-श्रेयस तळपदेने चाहत्यांना दिली गुड न्यूज, म्हणाले, “आम्ही लवकरच…”

श्रेयसचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट कन्नड भाषेमध्ये असणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘अजग्रथा’ असं आहे. श्रेयसने या चित्रपटाच्या टीमबरोबरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या चाहत्यांना तो दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार असल्याची आनंदवार्ता दिली. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल क्राइम थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन एम शशिधर करत असून अभिनेत्री राधिका कुमारस्वामी या चित्रपटात श्रेयस तळपदेबरोबर प्रमुख भूमिकेत दिसेल.

हेही वाचा : Video: रश्मिका मंदानाला पाहून श्रेयस तळपदे फिदा; म्हणाला, “सिर्फ मेरेकु देखि नहीं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाच्या टीमबरोबरचे फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “माझी पहिली साउथ फीचर फिल्म… तुम्ही मला दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी डब केलेल्या व्हर्जनसाठी इतकं प्रेम दिलंत, त्यानंतर आता तुम्ही मला दाक्षिणात्य चित्रपटाचा हिरो म्हणून पाहणार आहात… नवीन सुरुवात.” आता त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याचे चाहते आणि मनोरंजनसृष्टीतील त्याची मित्रमंडळी त्याचं अभिनंदन करत आहेत.